कितीतरी लोकांनी मातोश्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला : रामदास कदम

सुशांतसिंह प्रकरणावरून शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गेल्या काही दिवसापासून चर्चेत आले आहे.
कितीतरी लोकांनी मातोश्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला : रामदास कदम

मुंबई : " कितीतरी लाटा आल्या आणि गेल्या, कितीतरी लोकांनी मातोश्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. यातून काहीही निष्पन्न झाले नाही. आता आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी टीका शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते रामदासभाई कदम यांनी केली आहे. 

कदम हे फडणविसांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. ते नेहमीच ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. ते आज मंत्रिमंडळात नसले तरी शिवसेनेला कोणी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला की ते अधिक आक्रमक होत असतात. 

सुशांतसिंह प्रकरणावरून शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गेल्या काही दिवसापासून चर्चेत आले आहे. यापूर्वी संजय राऊत यांनीही हिम्मत असेल तर आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन दाखवा असे खुले आव्हान दिले आहे. आदित्य यांच्या बचावासाठी शिवसेनेचे सर्वच नेते सरसावले आहेत. आज तर रामदास कदम यांनीही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बाजू उचलून धरली. 

ते म्हणाले, "" आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचे काम सुरू झालंय, यातून काही निष्पन्न होणार नाही. अशा कितीतरी लाटा आल्या आणि गेल्या, कितीतरी लोकांनी मातोश्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आता आदित्य ठाकरेंची बदनामी सुरू आहेत पण, यातून "दूध का दूध आणि पाणी का पाणी' लवकरच स्पष्ट होईल. 

कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनही सिंचन क्षेत्र केवळ दीड टक्के आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात 50 टक्के सिंचन झालंय. कोकणाला पाटबंधारेसाठी निधी दिला जात नाही. कोकणाचा सिंचन अनुशेष भरला जावा,य्‌ासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. 

कोयनेचे पाणी समुद्रात वाहून जाते. टिएमसी पाणी मुंबईला आणि साडेसात टिएमसी नाणारला देणार असं सल्लागारानं सुचवलंय. यातील 50 टक्के पाणी रत्नागिरी सिंधुदुर्गला द्यावे, इथली तहान भागल्यावरच ते पाणी दुसरीकडं वळवावं. तोपर्यंत एक थेंबही पाणी बाहेर जावू देणार नाही 3800 कोटींचा 11 नद्या स्वच्छ करण्याचा प्रस्ताव निती आयोगाला पाठवलाय. त्याचेही निवेदन दिलंय असेही कदम यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com