NIAच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं...हिरेन हत्येच्या आदल्या रात्री मानेनं मोबाईल बंद करून बँगेत ठेवला.. - Mansukh Hiren murder case Sunil Mane switch off his mobile put it in his bag. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

NIAच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं...हिरेन हत्येच्या आदल्या रात्री मानेनं मोबाईल बंद करून बँगेत ठेवला..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

न्यायालयाने सुनिल मानेची NIA कोठडी 1 मे पर्यंत वाढवली आहे.

मुंबई :  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी नवीन खुलासे येत आहे.  या प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलिस निरीक्षक सुनील मानेच्या चौकशीत मनसुखच्या हत्येवेळी माने देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचा संशय आता एनआयएला NIA आहे. हत्येच्या आदल्या राञी मानेनं स्वत:चा मोबाईल बंद करून स्वत:च्या बँगेत ठेवला  आणि बँग सहकाऱ्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितली. त्यानंतर माने खासगी गाडीने कळवावा पोहचला. त्या ठिकाणी वाझे रुमाल खरेदी करून मानेच्या गाडीत बसला. त्यानंतर दोघं रेतीबंदर परिसरात पोहचले. त्या ठिकाणी मानेनं तावडे या नावाने मनसुखला बोलावून घेतले. 

मनसुख आल्यानंतर मानेनं त्यांचा फोन काढून घेत, तो बंद केला. त्यानंतर माने आणि वाझेने मनसुख यांना दुसऱ्यांच्या ताब्यात दिलं.  त्यानंतर माने वसईला गेले. तेथे त्यांनी मनसुखचा मोबाइल पून्हा सुरू करून मनसुख  हे वसईला गेल्याचे दाखवून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला, असे NIA वकिलांनी कोर्टात सांगितले.

न्यायालयाने सुनिल मानेच्या NIA कोठडी 1 मे पर्यंत वाढवली आहे. सचिन वाझेच्या वकिलांनी कोर्टात वाजेला पाठदुखीचा ञास असून जेलमध्ये बसण्यास खुर्ची आणि झोपायला गादीची मागणी केली. माञ न्यायालयाने ती फेटाळून लावली.तसेच सचिन वाझेच्या वकिलांनी वाजेच्या दातावर ट्रिटमेंटची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने कारागृह नियमानुसार त्यांना वैद्यकीय उपचार मिळतील, असे सांगितले.

मनसुखच्या हत्येवेळी माने देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचा संशय आता एनआयएला NIA आहे. कारण ता. ४  मार्चला कुणालाही न सांगता मोबाईल गुन्हे शाखा कार्यालयात ठेवूनच माने बाहेर गेले होता. ज्या पद्धती निंलबित पोलिस अधिकारी सचिन वाझेने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मोबाइल कार्यालयात ठेवून लोकलने प्रवास करून ठाणे गाठले. त्याच पद्धतीने मानेनंही तपासा दरम्यान ते कार्यालयातच असल्याचे एनआयएच्या NIA अधिकाऱ्यांना सांगितलं होते. माञ मोबाइल कार्यालयात ठेवून कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर कार्यालयापासून काही अंतरावर उभ्या एका गाडीत बसून गेल्याचं सांगितलं जात आहे.  

याबाबत मानेचे दोन आँडर्ली आणि दोन चालकांची NIAनं चौकशी केली आहे. या चौघांच्या चौकशीतून NIAला माने त्या दिवशी नेमकं कुठे होता. हे जाणून घ्यायचं असावं, खरतर सरकारी नियमानुसार जर सरकारी कर्मचाऱ्याला त्याला देण्यात आलेली सरकारी गाडी प्रवासासाठी वापरायची झाल्यास, त्याची गाडीची आणि कुठल्या कामासाठी कुठे जाणार याची नोंद लाँकबुकमध्ये करावी लागते. त्यानुसार NIAनं ते लाँकबुक स्वत:च्या ताब्यात चौकशीसाठी घेतलं आहे.
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख