मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIA कडे..गृहमंत्रालयाचा आदेश.. - mansukh hiren death case taken over by nia earlier being investigated by maharashtra ats | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIA कडे..गृहमंत्रालयाचा आदेश..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 मार्च 2021

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला  देण्याचा आदेश गृहमंत्र्यालयाने आज दिला आहे.

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) देण्याचा आदेश गृहमंत्र्यालयाने आज दिला आहे. 'एटीएस'कडून हा तपास काढून घेण्यात आला आहे. 'एटीएस'ने या प्रकरणात शोधलेले पुरावे 'एनआयए' 'एटीएस'कडून घेणार आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास 'एटीएस'चे मुख्य अतिरिक्त महासंचालक जय जीत सिंह आणि उपमहानिरीक्षक शिवदीप पांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत होता.  

मुंबई प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ऍन्टीलिया या घराजवळ काल (ता. 25 फेब्रुवारी) सायंकाळी संशयित गाडी आढळून आली आहे. त्या गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या होत्या. पोलिसांना गाडीत मिळालेल्या पत्रामध्ये म्हटलं होते की, 'ये सिर्फ ट्रेलर है.. निता भाभी, मुकेश भैया...फॅमिली येतो झलक है ! इंतजाम हो गया है! संभल जाना..'

ही गाडी मनसुख हिरेन यांची असल्याचे तपासात उघड झाले आहे. मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला होता. मनसुख यांच हात पाठीमागे बांधलेले होते. मनसुख यांच्या शवविच्छेदनाच्या वेळी पोलिस निरीक्षक सचिन वाझे हे हजर होते. 

हिरेन त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हे दुकानात असताना त्यांना कांदिवलीतून तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. ८: ३० च्या सुमारास याबाबत त्यांनी घरातल्यांना कळवून रिक्षाने दुकानाबाहेर पडले. माञ राञी उशिरा कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता. त्यानंतर सकाळी मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.  मनसुख यांचा मृतदेह ज्या वेळी खाडीतून बाहेर काढला. त्यावेळी त्यांच्या तोंडाला मास्क होते. मनसुख यांचा मोबाइल हा मृतदेहासोबत सापडलेला नाही. मनसुख याला आलेल्या फोनची माहिती मिळवून हा कांदिवलीचा तावडे कोण, याचा शोध घेत आहेत. तावडे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

हेही वाचा : सचिन वाझेंनी बनावट नंबरप्लेट खाडीत फेकल्या...NIA ला संशय.. 

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए)च्या तपासात पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेंनी काही वाझेने काही बनावट नंबरप्लेट पाण्यात म्हणजेच खाडीत फेकल्याची माहिती समोर येत आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने  सीसीटीव्ही (CCTV), आणि डिव्हिआरमध्येही छेडछाड केली असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती एनआयए (NIA)च्या सूञांकडून समजते. 

 Edited  by :  Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख