मॅनहोलची जबाबदारी कंत्राटदाराची.... कारवाई करा..

नाल्यात कोणी नागरिक पडल्यास त्याला महापालिका जबाबदार नाही, असा फलक लावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार योगेश सागर यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.
Yogesh Sagar.jpg
Yogesh Sagar.jpg

मुंबई : नाल्यात कोणी नागरिक पडल्यास त्याला महापालिका जबाबदार नाही, असा फलक लावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार योगेश सागर यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. महापालिका व कंत्राटदार यांच्यातील करारानुसार ही जबाबदारी कंत्राटदाराची असते, असेही त्यांनी दाखवून दिले आहे. 
    
काही वर्षांपूर्वी गोरेगाव पूर्व येथील वसाहतीत उघड्या गटारात पडून एक बालक मृत्युमुखी पडले होते. त्याच ठिकाणी महापालिकेने काल असा फलक लावला आहे. गोरेगाव परिसरातील छोट्या-मोठ्या नाल्यांच्या पाण्यात अतीवृष्टीमुळे वाढ होऊ शकते. याबाबत नागरिकांनी लहान मुले, अंध, दिव्यांग व्यक्तींची काळजी घ्यावी. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असे या फलकावर लिहिले होते. यासंदर्भात योगेश सागर यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.  

गोरेगाव परिसरातील नाल्याच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सूचित करण्यात येते की अतिमुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर येऊन धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी घरातील लहान मुले, अंध व्यक्तींबाबत दक्षता घ्यावी. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही,'' अशा आशयाचे सूचना फलक महापालिकेने काल लावला आहे.

याप्रकाराबाबत परिसरातील नागरिकांनी कमालीचा रोष व्यक्त केला होता. मृत दिव्यांशचे वडील सूरजभान सिंग म्हणाले की, पालिकेने लावलेले सूचना फलक म्हणजे आम्ही मुद्दाम नाल्यात पडावे, असे वाटते. या प्रकारचे सूचना फलक लावताना पालिकेला लाज नाही वाटली. सूचना फलक लावण्यापेक्षा पालिकेने उघडे नाले, मॅनहोल बंद केले असते तर बरे झाले असते. ज्याठिकाणी गतवर्षी दिव्यांश नाल्यात पडला होता, अगदी त्याच ठिकाणी पालिकेने सूचना फलक लावला आहे. त्यावरील मजकूर वाचून पालिका आपली जबाबदारी झटकत असल्याचे समोर येत आहे. 

महापालिकेची वरील भूमिका अत्यंत दुर्देवी आहे. अशा प्रकारे महापालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही. मॅनहोल, नाले, गटारे बांधणाऱ्या कंत्राटदारात व महापालिकेत झालेल्या करारानुसार ही जबाबदारी कंत्राटदाराची असते. महापालिका व कंत्राटदार हे आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलू शकत नाही, किंवा आपली जबाबदारी नाही, असे म्हणू शकत नाहीत. त्यामुळे असा फलक लिहून जबाबदारी नागरिकांवरच टाकणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे असा दिशाहीन व असंयुक्तिक फलक लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असेही योगेश सागर यांनी या पत्रात लिहिले आहे. 

मुंबईत अनेकदा मॅनहोल उघडे असल्याने दुर्घटना घडतात. 2017 च्या अतिवृष्टीत प्रभादेवी परिसरात दीपक अमरापूरकर हे डॉक्टर पुराच्या पाण्यात उघडे ठेवलेल्या मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडले होते. शहरात एरवीही अनेकदा अशा मॅनहोलची झाकणे तुटल्याने उघडी पडलेली असतात. त्यात अडकून वाहनांचे किंवा पादचाऱ्यांचेही अपघात होतात. महापालिका अशा मॅनहोलच्या झाकणांची त्वरेने दुरुस्ती करण्याऐवजी तेथे लोकांना सूचना मिळावी म्हणून बांबू किंवा झाडांच्या फांद्या लावून ठेवते. तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यातच गोरेगावात दिव्यांश हा दोन वर्षांचा मुलगा उघड्या गटारात पडून वाहून गेला होता. त्याचा मृतदेहदेखील मिळाला नाही. याचसंदर्भात सागर यांनी हे पत्र लिहिले आहे.
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com