राज्यातील अधिकाऱ्यांच्या कुठे झाल्या बदल्या ; वाचा सविस्तर - mahavikas aaghadi government transfers of 20 ias officers  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

राज्यातील अधिकाऱ्यांच्या कुठे झाल्या बदल्या ; वाचा सविस्तर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

गुप्ता, विकास रस्तोगी या अधिकाऱ्यांसह एकूण 20 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने आयएएस IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यावर भर दिला आहे. नुकत्याच सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता तब्बल २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ओ. पी. गुप्ता, विकास रस्तोगी या वरीष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 20 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाकरे सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीसंबंधी माहिती दिली आहे.

ओ. पी. गुप्ता वित्त विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. विकास चंद्र रस्तोगी यांची उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. इंद्रा मल्लो सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथं प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पाटील यांची सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथून सहसचिव पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई इथं नियुक्ती करण्यात आली आहे. रुबल अग्रवाल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त पदावरुन आता आयसीडीसी नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोल्याचे एमएस एसिड कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालकपदावरून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जालनाच्या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची थेट पुणे महापालिका आयुक्त म्हणून बदली केली आहे. दीपककुमार मीना यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. पवनीत कौर यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाचा कार्यभार होता.

विजय चंद्रकांत राठोड यांना जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. निमा अरोरा यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. आंचल गोयल यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी बदली केली आहे. डॉ. बी.एन.पाटील यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी बदली केली आहे.

दौलत देसाई जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची बदली वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या संयुक्त सचिवपदी मुंबईत झाली. रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची बदली महिला व बाल विभाग, पुणे येथे आयुक्तपदी करण्यात आली. संजय यादव यांची बदली एमएसआरडीसी, मुंबई येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली आहे. शैलेश नवाल यांची जिल्हाधिकारी, अमरावती यांना मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी नियुक्त केली आहे. आर. एच. ठाकरे यांची नागपूरच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी निवड केली आहे.

अकोल्याचे जिल्हाधिकारी जे. एस. पापळकर यांची अकोला महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदावरून जी. एम. बोडके यांची हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून निवड केली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख