गणेशमूर्ती विसर्जन शक्यतर पुढीलवर्षी करावे; राज्य शासनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होण्यासाठी राज्याच्या गृहखात्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Maharashtra home ministry issued guideline for ganesh festival
Maharashtra home ministry issued guideline for ganesh festival

मुंबई : कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी या उत्सवातील गणेशमूर्तींचे विसर्जन शक्य असल्यास माघी गणेशोत्सवातील किंवा 2021 च्या गणेशोत्सवातील विसर्जनप्रसंगी करावे, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे. भाविकांना शक्यतो ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी, मात्र मंडपात प्रत्यक्ष दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोशल डिस्टन्सिंग व आरोग्यविषयक नियमांचे पालन करावे, असेही त्यात म्हटले आहे. 

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होण्यासाठी राज्याच्या गृहखात्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यावर्षी शक्यतोवर घरातील धातूच्या किंवा संगमरवराच्याच मूर्तींची पूजा करावी. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, मंडळे आदींच्या साह्याने परिसरातच कृत्रीम तलावाची निर्मिती करून तेथेच विसर्जन करावे, असेही शासनाने सुचविले आहे. अर्थात सार्वजनिक उत्सवासाठी महापालिकेची व
स्थानिक प्रशासनाची संमती आवश्यक आहे. 

यंदाचा गणेशोत्सव साध्या प्रकारे करायचा असल्याने मर्यादित स्वरुपाचेच मंडप उभारावेत. सजावटीत भकपेबाजी
नसावी, शक्यतो घरातील धातूच्या वा संगमरवराच्या मूर्तीचे पूजन करावे. सार्वजनिक मूर्तींची उंची चार फूट तर घरगुती मूर्तींची उंची दोन फूट असावी, असेही सरकारने सांगितले आहे. 

मंडपात आरोग्यविषयक आणि सामाजिक संदेशांच्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात, जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही हे पहावे. भाविकांसाठी ऑनलाईन, केबल, फेसबुक आदी माध्यमांद्वारे दर्शनाची व्यवस्था करावी, पण प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम उदा. मास्क, सॅनिटायझर यांच्याकडे लक्ष द्यावे. शाडूच्या किंवा पर्यावरणपूरक मूर्ती असल्यास त्यांचे विसर्जन घरीच किंवा नजीकच्या कृत्रिम तलावात करावे. विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सव विसर्जनात किंवा 2021 च्या विसर्जनप्रसंगी करावे. महापालिका,
मंडळे, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आदींच्या साह्याने विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी. एरवी विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी व तेथे भाविकांनी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी विसर्जनासाठी जाऊ नये. तसेच चाळीतील-इमारतीतील सर्व मूर्तींची मिरवणूक एकत्र काढू नये, असेही सरकारने सुचवले आहे.

वीज वितरण कंपनीत महत्वाचे निर्णय

मुंबई : गेल्या सरकारच्या काळात पांढरे हत्ती ठरलेल्या, महावितरणचे प्रादेशिक कार्यालय असलेल्या सहव्यवस्थापकीय संचालकांना अधिकार बहाल करण्याच्या निर्णयाप्रत ऊर्जामंत्री आले आहेत. या संदर्भात सादर करण्यात आलेल्या सादरीकरणानंतर डॉ. नितीन राऊत यांनी ही माहीती दिली. असे झाले तर महावितरणच्या कामाला गती येणार असून राज्यातील वीज ग्राहकांना याचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com