राज्यपालांचा निर्णय; वनहक्कांचे दावे नामंजूर झालेतरी आदिवासींना दाद मागता येणार

नव्या अधिसुचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या असून सदर समित्यांकडे जिल्हा समितीच्या निर्णयांच्या विरोधात अपील करता येणार आहे.
maharashtra governor bhagatsingh koshyashri made changes in scheduled tribe related act
maharashtra governor bhagatsingh koshyashri made changes in scheduled tribe related act

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनुसुचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६  या कायद्यामध्ये  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रासंदर्भात काही सुधारणा केल्या आहेत.

भारतीय संवधिनाच्या पाचव्या अनुसुचीमधील प्राप्त अधिकारांचा वापर करुन राज्यपालांनी दिनांक १८ मे २०२० रोजी एका अधिसूचनेव्दारे उपरोक्त कायदयाच्या कलम ६ मध्ये या सुधारणा केल्या आहेत.

वन हक्क कायद्याअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले आहेत, अशा आदिवासी बांधवांना या अधिसूचनेमुळे समितीच्या आदेशाविरोधात दाद मागता येणार आहे. सदर अधिसूचना राज्यातील पेसा क्षेत्राकरीता लागू असेल. 

नव्या अधिसुचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या असून सदर समित्यांकडे जिल्हा समितीच्या निर्णयांच्या विरोधात अपील करता येणार आहे. 

जिल्हास्तरीय समितीकडून वैयक्तिक व सामुदायिक वनहक्कांचे दावे मोठ्या प्रमाणात नामंजूर करण्यात येत असल्याचे राज्यपालांचे निदर्शनास आले होते. मात्र जिल्हा समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची सदर कायद्यात कुठलीही तरतूद नव्हती. अधिसूचनेमुळे बाधित आदिवासींना दिलासा मिळणार आहे.

राज्यात 5 लाख 67 हजार 622 लोक होम क्वारंटाईनमध्ये

मुंबई : राज्यात मंगळवारी कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 54 हजार 758 एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 90 हजार 170 नमुन्यांपैकी 54 हजार 758 जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 67 हजार 622 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 97 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी झाली असून एकूण संख्या 1792 झाली आहे. मंगळवारी नोंद झालेल्या मृत्यूपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसातील आहेत. तर उर्वरित दोन मृत्यू हे 17 एप्रिल ते 23 मे या कालावधीतील आहेत.  या कालावधीतील 62 मृत्यूपैकी मुंबईचे 19, ठाण्याचे 15, कल्याण-डोंबीवलीचे 9, सोलापूरचे 6, मिरा-भाईंदरचे 5, उल्हासनगरचे 3, मालेगाव मधील 3 तर पुण्यातील एक आणि औंरगाबादमधील 1 मृत्यू झाला आहे. झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 39, पुण्यात 8, ठाणे शहरात 15, औरंगाबाद शहरात 5, सोलापूरात 7, कल्याण डोंबिवलीमध्ये 10, मीरा-भाईंदरमध्ये 5, मालेगाव आणि उल्हासनगर मध्ये प्रत्येकी 3, नागपूर शहरात 1, रत्नागिरीमध्ये 1 मृत्यू  झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com