Maharashtra energy minister nitin raut praises gondia pattern | Sarkarnama

वीज बिलांच्या वसुलीचा 'गोंदिया पॅटर्न' राज्यात राबवा : ऊर्जामंत्री नितीन राऊत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जुलै 2020

राज्यात मेळघाट, गडचिरोली तसेच विदर्भातील उर्वरित गावांचे विद्युतीकरण पारंपरिक पद्धतीने करावे

मुंबई : स्वातंत्र्यानंतर अद्यापही भौगोलिक कारणामुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसारख्या दुर्गम भागातील काही आदिवासी व दुर्गम गावाचे विद्युतीकरण झालेले नाही, अशा गावांचा आढावा आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. महावितरणला या संदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 

राज्यात मेळघाट, गडचिरोली तसेच विदर्भातील उर्वरित गावांचे विद्युतीकरण पारंपरिक पद्धतीने करावे. दुर्गम भागातील काही गावात जर वीज पोहचली नसेल तर याची माहिती घेऊन विद्युतीकरण करण्यासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश देऊन डॉ. राऊत यांनी, वनक्षेत्रात वीज यंत्रणा उभी करण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळाली नसेल अशा भागासाठी वनविभागासोबत तातडीने बैठक घेण्याची सूचना त्यांनी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना यावेळी दिल्या. 

ग्राहकांकडून वीज बिलांच्या वसुलीबाबत तयार करण्यात आलेल्या गोंदिया पॅटर्नचे डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले. तसेच हा गोंदिया पॅटर्न राज्यात इतरत्र राबवण्याची सूचनाही त्यांनी केली.

नागपूर शहरालगत असलेल्या बाह्य भागात विद्युत वितरण प्रणालीचे बळकटीकरण करण्यात यावे. महावितरण नागपुर परिक्षेत्रातील जुने मीटर बदलून नवीन अद्यावत मीटर बसवणे. यासोबतच महावितरणचे सदोष जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविणे, नादुरुस्त रोहित्रे व ऑईल पुरवठा या बाबीचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला.

समृद्धी एक्सप्रेसवेसाठी समांतर वीजवाहिन्या टाकणे, कोस्टल रोड क्षेत्रामध्ये भूमिगत वाहिन्या टाकणे, डॅशबोर्ड प्रणाली अद्यावत करणे, पेड पेंडीग व नव्याने अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय (एसएसी, एसटी, ओबीसी) लाभार्थ्यांना जोडण्या उपलब्ध करून देणे, राज्यातील चारही वीज कंपनीच्या मालकीच्या जमिनीच्या नोंदी करणे व 'एक गाव एक दिवस मेंटेनन्स' योजनेचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी यावेळी दिल्या. 

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी मुलाखती

पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी गेल्या आठवड्यात जवळपास चाळीस इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या इच्छुकांमधून कुणा एकाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ येत्या काही दिवसांत पडण्याची शक्यता आहे. नवी जबाबदारी देताना पक्ष अध्यक्षपदाची माळ तळातून आलेल्या कार्यकर्त्याच्या गळ्यात घालणार की घराणेशाही जपणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

अजिंक्यराणा पाटील यांनी हे पद सोडल्याने पक्षाच्या विद्यार्थी आघाडीची जबाबदारी नव्या कार्यकर्त्यावर सोपविण्यात येणार आहे. १० जुलैला यासाठी मुंबईत २५ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ज्यांना मुलाखतीला येता आले नाही. त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या.  

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख