Maharashtra cyber police appeals about corona patient related posts | Sarkarnama

त्यांना व्हाट्सएप ग्रुपमधून 'रिमूव्ह' करा आणि सेटिंग 'only admin' करा!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 जुलै 2020

आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 197 गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 215 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई : कोरोना रुग्णांची माहिती कोणी तुम्हाला फॉरवर्ड करत असतील तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे करण्यापासून परावृत्त करा व ग्रुप ऍडमिनने अशा सदस्यांची ग्रुपमधून हकालपट्टी करावी आणि ग्रुप सेटिंग 'only admin' असे करावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात 516 गुन्हे दाखल झाले असून 273 व्यक्तींना अटक केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण 516  गुन्ह्यांची (ज्यापैकी 39 N.C आहेत) नोंद 2 जुलै 2020 पर्यंत झाली आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 197 गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 215 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 28 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 11 गुन्हे दाखल झाले आहेत इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी 61 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 273 आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी 108 आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाउन करण्यात य अकोला जिल्ह्यातील जुनाशहर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे  

ग्रुप सेटिंग 'only admin'

सध्या कोरोना महामारीच्या काळात व्हाट्सअँपवर तसेच अन्य सोशल मीडियावर कोरोनाग्रस्त रुग्णांची नाव व अन्य माहिती प्रसारित होत आहे. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना अशी विनंती करते की, कृपया तुम्हाला अशा आशयाचा काही पोस्ट्स आल्या तर आपण त्या पोस्ट्स पुढे पाठवू नये. रुग्णांची माहिती अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला फॉरवर्ड करत असतील तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे करण्यापासून परावृत्त करा, व ग्रुप ऍडमिनने अशा सदस्यांची ग्रुपमधून हकालपट्टी करावी आणि ग्रुप सेटिंग 'only admin' असे करावे. कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती अशा प्रकारे प्रसिद्ध करणे हा कायदेशीर
गुन्हा आहे आणि त्यामुळे असे मेसेज, विडिओ, किंवा पोस्ट्स टाकणाऱ्या व्यक्तींवर व संबंधित व्हाट्सअँप ग्रुप ऍडमिन्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागामार्फत देण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख