मोठी बातमी : एकवीस कोटींच्या युरोनियमसह दोघांना अटक...स्फोटक बनवण्यासाठी  वापर ? 

एका युरेनियमचा किंमत ३ कोटी रुपये आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-06T124000.401.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-06T124000.401.jpg

मुंबई : महाराष्ट्र एटीएस मोठी कारवाई  केली असून  7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक केली आहे.  हे दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. अबू ताहीर (वय ३१), जिगर पांडे (वय २७) अशी या दोघांची नावे आहेत. Maharashtra ATS major operation and arrested two persons with 7 kg of uranium

अदर पूनावाला यांच्या जीवाला धोका! झेड प्लस सुरक्षेसाठी उच्च न्यायालयात याचिका
 
या दोन्ही आरोपींकडून जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे. काल दुपारी भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरच्या अधिकाऱ्यांनी या युरेनियमचा खाञी केली.

या युरेनियमचा वापर स्फोटक बनवण्यासाठी होणार होता का ? याचीही चौकशी केली जाणार आहे.  एका युरेनियमचा किंमत ३ कोटी रुपये आहे. आरोपींनी हे युरेनियम एका खासगी लँबमध्ये त्याच्या प्युअरिटीसाठी तपासले होते. नागपाडा एटीएसने ही कारवाई केली आहे.

 
हेही वाचा : मोठा बेड घोटाळा : महापालिकेतील कर्मचारी घेतात बेडसाठी 25 ते 50 हजारांची लाच
 
बेंगलुरू : भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेमध्ये एका बेडसाठी तेथील कर्मचारी 25 ते 50 हजारांची लाच घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा कोरोना (Covid19) बेड घोटाळा (Bed Scam) भाजपच्याच (BJP) खासदारांनी  उघडकीस आणल्याने भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कोरोना रुग्ण वाढू लागल्याने रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत. नातेवाईकांना अनेक तास चकरा मारून एखादा बेड उपलब्ध होत आहे. याचाच गैरफायदा घेतला जात आहे. बेंगलुरू महापालिकेच्या रुग्णालयांसाठी केंद्रीय बेड नोंदणी पध्दत ठेवण्यात आली आहे. यामध्येच घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी केला आहे. बेंगलुरू महापालिकेसह कर्नाटकातही भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे सुर्या यांच्या आरोपांची मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com