ATS ची मोठी कारवाई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी निलंबित हवालदारासह दोघांना अटक

निलंबित पोलिस हवालदारविनायक शिंदे व बुकी नरेश धरे यांना अटक करण्यात आली आहे.
Maharashtra ATS Arrested Two persons in Connection with Mansukh Hiren Case
Maharashtra ATS Arrested Two persons in Connection with Mansukh Hiren Case

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ने निलंबित पोलिस हवालदार विनायक शिंदे व बुकी नरेश धरे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानतर 30 मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांना अटक केल्याने एटीएसला मनसुख हिरेन मृत्यूचे महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा केला जात आहे. 

मनसुख हिरेन यांचा मृतदेह पाच मार्च रोजी रेतीबंदर परिसरात आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनीच केल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला होता. विधानसभेत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात राळ उठवली होती. त्यानंतर काही दिवसांतच सचिन वाझेंना एनआयएने (NIA)अटक केली. 

या प्रकरणाचा तपास एसटीएसकडून केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास देण्याचे आदेश दिले आहेत. आज एटीएसने याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. या दोघांचा हत्या प्रकरणात नेमका काय संबंध होता का, हे एटीएसकडून तपासले जात आहे. (Maharashtra ATS Arrested Two in Connection with Mansukh Hiren Case)

निलंबित पोलिस हवालदार विनायक शिंदे व बुकी नरेश धरे अशी या दोघांची नावे आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांनाही 30 मार्चपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दोघांना अटक करण्यात आल्याने हिरेन यांच्या मृत्यामागेच कोडे लवकरच उलगडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याजवळ २५ फेब्रुवारीला संशयित गाडी आढळून आली होती. त्या गाडीत जिलेटीनच्या २५ कांड्याही सापडल्या होत्या. या गाडीचे मालक मनसुख हिरेन हे होते. त्यामुळे हिरेन यांचाच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव पुढे आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) देण्याचा आदेश गृहमंत्र्यालयाने दिला आहे. 'एटीएस'कडून हा तपास काढून घेण्यात आला आहे. 'एटीएस'ने या प्रकरणात शोधलेले पुरावे 'एनआयए' 'एटीएस'कडून घेणार आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास 'एटीएस'चे मुख्य अतिरिक्त महासंचालक जय जीत सिंह आणि उपमहानिरीक्षक शिवदीप पांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत होता.  

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com