Valentines Day : प्रेम, मास्क, सहा फूट अंतर अन् मुंबई पोलिस...

व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दिवसानिमित्त मुंबई पोलिसांनी प्रेमळ शब्दांमध्ये नागरिकांना कोरोना महामारीची आठवण करून दिली आहे.
Love Mask And 6 Feet Distance says Mumbai Police On Valentines Day
Love Mask And 6 Feet Distance says Mumbai Police On Valentines Day

मुंबई : व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दिवसानिमित्त मुंबई पोलिसांनी प्रेमळ शब्दांमध्ये नागरिकांना कोरोना महामारीची आठवण करून दिली आहे. पोलिसांनी एक छोटा व्हिडिओ ट्विटरवर टाकला आहे. 'आपल्यातील अंतर प्रेम अधिक वाढवत नेत असते', असा संदेश पोलिसांनी दिला आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनीही सुरक्षेविषयी लोकांना जागृत करणारा संदेश दिला आहे.

मुंबई पोलिसांकडून विविध विषयांवर नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी अनेकदा अतिशय कलात्मक पध्दतीने सोशल मिडियाचा वापर केला जातो. यापूर्वीही अनेकदा विविध सण-उत्सवाचे निमित्त साधून नागरिकांमध्ये ट्विटरच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. आज व्हॅलेंटाईन्स डे निमित्तही मुंबई पोलिस नागरिकांपर्यंत पोहचले आहेत. 

मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडरवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यातून त्यांनी कोरोनापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ''या व्हॅलेंटाईन डे दिवशी आपल्या सर्वांना प्रेम, मास्क आणि सहा फूट अंतराची गरज आहे,'' असे ट्विटरवर म्हटले आहे. तसेच व्हिडिओमध्ये मास्क घातलेली मुलगी व मुलगा दाखविण्यात आले आहेत. 

मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही कोरोनाची आठवण करून देण्यात आली आहे. ''व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रत्येकाला ऐकावेसे वाटणारे तीन जादूई शब्द - सर्वात प्रथम सुरक्षा" असे म्हटले आहे. तसेच ''ढाई अक्षर प्यार के दो गज सेफ्टी के'' असा मजकूर असलेले छायाचित्रही टाकण्यात आले आहे. 

मुंबई पोलिसांच्या या ट्विटचे अनेक नेटकऱ्यांनी स्वागतही केले आहे. तर काहींनी मुंबईतील बसमधील गर्दीचे फोटो टाकून पोलिसांना प्रश्न विचारला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com