महाराष्ट्रात १५ मे पर्यंत लॅाकडाउन ?   - Lockdown in Maharashtra till May 15 Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

महाराष्ट्रात १५ मे पर्यंत लॅाकडाउन ?  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

लॅाकडाउन वाढवायचा की नाही याबाबत १ मे ला निर्णय घेण्यात येणार आहे. 

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी  १५ मे पर्यंत लॅाकडाउन वाढवायचा की नाही, याबाबत लॅाकडाउनच्या शेवटच्या दिवशी (ता. १ मे) ला निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत  बैठक झाली. राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा केली. बहुतांश मंत्र्यांनी राज्यातील लॅाकडाउन वाढवावा, असे मत व्यक्त केले. राजेश टोपे यांनी सांगितले की,  १५ मे पर्यंत लॅाकडाउन वाढवायचा की नाही याबाबत १ मे ला निर्णय घेण्यात येईल. 

राजेश टोपे म्हणाले की सध्या कोरोना लशींचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना परत जावे लागत आहे. आजच्या बैठकीत रेमडेसिविर बाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यभरात अॅाक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत सरकारचा प्रामाणिकता आहे. रुग्णांचे आकडे लपविले जात नाही. 

हेही वाचा  :  महाराष्ट्रात सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस
 
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. यामुळे केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट काढून टाकली होती. आता 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्यात येणार आहे. राज्य सरकारने आज महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.  सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या नागरिकांची संख्या सुमारे 5.71 कोटी आहे. यासाठी राज्य सरकारला कोरोना लशीचे 12 कोटी डोस लागणार आहेत. लस खरेदीसाठी राज्य सरकारला 6 हजार 500 कोटी रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे.  18 वर्षांवरील व्यक्ती 1 मेपासून कोरोना लस घेण्यास पात्र आहेत. ते सरकारच्या को-विन प्लॅटफॉर्मवर आता नाव नोंदवू शकतात. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख