राऊतांना राणे दोषाची काविळ झाल्याने त्यांना राणेंचं खातं छोटचं वाटणार

संजय राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.
0Raut_20Darekar_20F.jpg
0Raut_20Darekar_20F.jpg

मुंबई :  ''शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रसारमाध्यमातून भाजपवर टीका करणे या पलीकडे काही दिसत नाही. नारायण राणेंना मिळालेलं खातं छोट आहे की मोठे हे येणाऱ्या काळामध्ये ते त्यांच्या कामातून दाखवून देतील. राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली असून त्यांना राणे साहेबांचे खातं छोटच वाटणार, '' अशी टिका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.Leader of Opposition Pravin Darekar slammed mp Sanjay Raut
  
केंद्र सरकराकच्या  दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. त्यामध्ये नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. राणे यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, राऊत यांना राणे साहेबांना काही मिळाले तरी ते छोटच वाटणार याची कल्पना आम्हाला आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना राणे साहेबांची उंची माहीत होती. त्यामुळेच त्यांनी राणे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.  
     

राणे यांना मिळालेलं खातं छोट आहे, की मोठं हे येणाऱ्या काळामध्ये राणेसाहेब त्यांच्या कार्यपध्दतीतून दाखवून देतील. त्यांना कोणतही खातं दिलं असतं तरी त्या खात्याला वजन प्राप्त करत जनतेला मदत करायचं काम ते नक्की केलं असतं, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे. ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी पशुपती कुमार पारस यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. पशुपती कुमार पारस यांचे पुतणे चिराग पासवान यांनी त्यांना शपथ घेण्यास विरोध केला होता. पारस यांच्याविरोधात चिराग पासवान यांनी पासस उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यावरुन पशुपती कुमार पारस यांनी चिराग यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com