समाजमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा आदेश मागे घ्या : प्रविण दरेकर

सीआरपीसीकायदयाच्या 144 कलमाच्या आधार घेऊन ही दडपशाही सुरु आहे. मात्र लोकशाहीमध्ये नागरिकांना त्यांच्या भावना व मते व्यक्त करण्याचा आहे, हेपोलिसांनी ध्यानात घ्यावे.
leader of opposition pravin darekar meets director general of police on social media restrictions
leader of opposition pravin darekar meets director general of police on social media restrictions

मुंबई :  मुंबईत समाजमाध्यमे वापरणाऱ्यांची मुस्काटदाबी करण्यासाठी काढलेला नवा आदेश म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली असून तो आदेश पोलिसांनी तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. 

दरेकर तसेच आमदार प्रसाद लाड यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची भेट घेऊन ही मागणी केली. या भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांना दरेकर यांनी सांगितले की, यासंदर्भात पोलिस दुटप्पी भूमिका घेत आहेत. भाजप कार्यकर्त्यांना पोलिस अटक करतात पण त्याच वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील सोशल मिडियामध्ये होणा-या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल तक्रारी केल्या असताना पोलिस काहीच कारवाई करीत नाहीत. 

सीआरपीसी कायदयाच्या 144 कलमाच्या आधार घेऊन ही दडपशाही सुरु आहे. मात्र लोकशाहीमध्ये नागरिकांना त्यांच्या भावना व मते व्यक्त करण्याचा आहे, हे पोलिसांनी ध्यानात घ्यावे. पोलिस प्रशासन हे सरकारच्या दबावाखाली काम करताना भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय करीत आहे. आमच्या तक्रारींबाबत मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे जाऊनही न्याय मिळाला नाही. आता महासंचालकांनीही न्याय दिला नाही तर वेळ पडल्यास आंदोलन व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असेही दरेकर म्हणाले. 

कोरोनाच्या फैलावाच्या काळात जनतेची सेवा करणा-या पोलिसांवर काही ठराविक प्रवृत्ती, ठराविक ठिकाणी हल्ले करित आहेत. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे पोलिसांसारखे कोविड योध्दे अशा परिस्थितीत हतबल झाले तर कोरोनाशी लढा देऊ शकत नाहीत. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य
वाढविण्यासाठी पोलिस प्रमुख या नात्याने महासंचालकांनी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे असेही दरेकर यांनी सांगितले. 

सर्व पॅसेंजर ट्रेन या सबसिडीवरच चालतात!

मुंबई : स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यातील सवलतीचा भाजपचा दावा खोटा ठरला असतानाही भाजपचे नेते ते मान्य करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयात सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांनीच त्यांचा हा खोटारडेपणा उघड करुनही त्यांची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच दिसते. आपला खोटेपणा
उघड पडला की वैयक्तिक पातळीवर घसरण्याची भाजपाची खोड जुनीच असून भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस यावे मी त्यांचा खोटारडेपणा पुराव्यासह सिद्ध करुन दाखवण्यास तयार आहे, असे जाहीर आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे. सावंत पुढे म्हणाले की, मोदीजींच्या तसेच आशिष शेलार यांच्या जन्माआधीपासून सर्व पॅसेंजर ट्रेन या सबसिडीवरच चालतात. केवळ स्लिपर क्लासचेच नाही तर फर्स्ट क्लासचे तिकिटही सबसिडाईज्ड असते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com