भाजपनेच मराठा आरक्षण दिले अन् संभाजीराजेंना खासदारही केले!

उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशिंग अशी सचिन सावंत यांची गतझाली आहे.
Chhatrapati Sambhaji Raje, Sachin Sawant, Praveen Darekar .jpg
Chhatrapati Sambhaji Raje, Sachin Sawant, Praveen Darekar .jpg

मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बोलताना मराठा आरक्षणविषयी (Maratha Reservation) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यवक्त केली होती. मोदींना मी चारवेळा पत्रव्यव्हार केला, पण अद्यापही मला भेट मिळाली नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले होते. त्यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. (Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar criticizes Congress spokesperson Sachin Sawant)

दरेकर म्हणाले की ''उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशिंग अशी  सचिन सावंत यांची गत झाली आहे. कसलीही माहिती न घेता ते मत ठोकून देतात. मराठा आरक्षण अन छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे त्यांनी आम्हाला शिकवू नये, असे दरेकर यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला भारतीय जनता पार्टीने आरक्षण दिले आणि छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje) यांना खासदारही भाजपनेच केले. मराठा समाजाला सदैव फसविणाऱ्या सावंत यांनी भाजपला शिकवू नये, असा इशारा दरेकर यांनी दिला.  

 
काँग्रेस –राष्ट्रवादी काँग्रेस यांची 1999 पासून पंधरा वर्षे राज्यात तर दहा वर्षे केंद्रात सत्ता होती. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी मराठा कार्यकर्त्यांना मारझोड करण्याचेच काम त्या सरकारने केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयातही टिकवले. आमचे सरकार होते तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही त्याला स्थगिती आली नाही. हे सगळे करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. त्यांना मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू चांगली समजते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवल्याचेही दरेकर म्हणाले.

केंद्रामध्ये सत्ता आल्यानंतर भाजपने छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार केले. त्यापाठोपाठ प्रयागराज (अलाहाबाद) येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संभाजीराजेंचा सन्मान पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोर भर सभागृहात केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनी उभे राहून संभाजीराजेंचे अभिनंदन केले. काँग्रेसने कोल्हापूरच्या छत्रपतींचा काय सन्मान केला हे आधी सचिन सावंत यांनी सांगावे. कधीतरी काँग्रेसकडून आपल्याला आमदारकी मिळेल या आशेने खुळावलेल्या सचिन सावंत यांनी उगाच छत्रपती संभाजीराजे यांची उठाठेव करू नये, असेही दरेकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com