तीन कोटीच्या खंडणीसाठी वकिलाने केले आपल्याच क्लायंटचे अपहरण... - Lawyer kidnaps his own client for Rs 3 crore ransom | Politics Marathi News - Sarkarnama

तीन कोटीच्या खंडणीसाठी वकिलाने केले आपल्याच क्लायंटचे अपहरण...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

शिपिंग कंपनीच्या मालकाकडून 3 करोडची खंडणी मागितली.

नवी मुंबई : आपल्याच क्लायंट असलेल्या शिपिंग कंपनीच्या मालकाकडून 3 करोडची खंडणी मागितली. मात्र पैसे दिले नाही म्हणून त्यांचे नवी मुंबईतून अपहरण करण्यात आले. याप्रकरणी आरोपी विमल झा याला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या विमल झा  याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. नवनाथ नारायण गोळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

नवनाथ नारायण गोळे यांना विमल झा याने डोळ्यावर पट्टी बांधत तीन वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी नेत मारहाण करण्यात आली. ज्या गाडीतून अपहरण करण्यात आले त्या गाडीचे टोल नाक्यावरील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

पहिल्यांदा कर्जत नंतर कल्याण रोड मार्गे मुरबाड आणि त्यानंतर माळशेज घाट गाठत आळे फाटा मार्गे नाशिकला एका फार्म हाऊसवर बंद खोलीत ठेवले होते.  यावेळी वारंवार पैश्यांचा तगादा लावत डोक्यात जबर मारहाण करण्यात आली. पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. जो पर्यंत पैसे देत नाही तो पर्यंत 3 ते 4 दिवस एकाच ठिकाणी ठेवण्याचा त्यांचा प्लॅन होता. 

नाशिकच्या बिग बझार मध्ये खरेदी करत असताना फिर्यादी गोळे यांनी नजर चुकवून बिग बझारमध्ये वर्करच्या मोबाईल वरून पत्नीस कॉल केला. त्यावरून पोलिसांना नाशिक येथील लोकेशन सापडले. पोलिसांच्या चतुराई आणि सतर्कतेमुळे फिर्यादीची सुटका झाली.  

आरोपीचे साथीदार फरार पोलिसांचा तपास सुरू

आरोपी वकील विमल झा याच्यासह गुन्ह्यात असलेले चार साथीदार फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहे. नवी मुंबईतून अपहरण करताना आरोपी सह तीन साथीदार होते आणि त्या नंतर नाशकात आणखी साथीदार सामील झाला. फिर्यादीला पैसे घेऊन ठार करण्याच्या बेतात हे सारे जण होते असे फिर्यादीने सांगितले. 

शिपिंग कंपनीचे मालक गोळे हे वकील विमल झा च्या संपर्कात गेल्या वर्षापासून होते. वकिलाने त्यांना तुमच्या कंपनीचे सगळे काम मी करून देतो असे आश्वासन देत काम दिले नसतानाही परत परत भेटण्यास भाग पाडले. विमल झा हा तेव्हा पासून गोळेंच्या मागावर होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख