मोदींवर लालूंची कन्या का भडकली ? म्हणाली..

आम्हा बहिणींचे नाव घेतलं तर याद राखा, असे रोहिणीआचार्य यांनी म्हटलं आहे.
Sarkarnama Banner - 2021-05-20T114727.896.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-20T114727.896.jpg

नवी दिल्ली  :  राष्ट्रीय जनता दलाचे RJDचे नेता तेजस्वी यादव Tejashwi Yadav यांच्या सरकारी निवासस्थानावर कोविडचे रुग्णालय सुरु आहे. यावर बिहारमध्ये विरोधकांनी टीका केली आहे. भाजपचे नेते, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी (Sushil Modi) यांनी या सर्व प्रकारला राजकीय नाट्य असल्याचे म्हटले. मोदींनी तेजस्वी यादव यांच्या एमबीबीएस  दोन्ही बहिनींवर टीका केली. lalu-yadav-daughter-rohini-acharya-reply-to-bjp-leader-sushil-modi-over-covid-care-center

लालू प्रसाद यादव यांचे चिंरजील तेजस्वी यादव यांनी पाटना येथे आपल्या सरकारी निवासस्थानी कोविड रुग्णालय सुरु केलं आहे. यावरून हा वाद निर्माण झाला आहे. "कोरोना काळात तेजस्वी यादव आपल्या डॅाक्टर बहीणींची मदत का घेत नाही," असा टोला मोदींनी तेजस्वी यादव यांना लगावला होता. याबाबत टि्वट सुशील मोदींनी केलं होत. भाजप नेते सुशील मोदी यांच्या टि्वटवर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य या संतापल्या आहेत. त्यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.  रोहिणी आचार्य यांनी टि्वट करीत मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्या आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, आमच्या नावावर राजकीय प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करु नका, आम्ही तेजस्वी यादव यांच्या बहिणी आहोत. यानंतर जर आम्हा बहिणींचे नाव घेतलं तर याद राखा, तुमच्या श्रीमुखात ठोसा मारणार. 

यापूर्वीही सुशील मोदींनी तेजस्वी यादव यांच्या बहिणींवर टीका केली आहे. मोदींनी टि्वट करुन म्हटले आहे की, तेजस्वी यादव यांच्या परिवारात दोन एमबीबीएस डॅाक्टर आहेत. कोरोना काळात त्याची मदत घेतली पाहिजे. राजदच्या नेत्यांना जर गरीबांची सेवा करायची होती तर त्यांनी कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यायला हवी होती. सरकारच्या नियमांचे पालन करायला हवं होते. डॅाक्टर, वैद्यकीय उपकरणे, कर्मचाऱ्याचा अभाव अशा  ठिकाणी नुसते बेड लावून कोविड रुग्णालय सुरु करता येत नाही, हे राजकीय नाटक आहे. 
 Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com