kurla mla mangesh kudalkar cured from corona virus | Sarkarnama

मी कोरोनावर यशस्वी मात केली, पण हे युद्ध लवकर संपणार नाही!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 जुलै 2020

दहा बारा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यावर कुडाळकर घरी आले आहेत. त्यांना आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. जून अखेरपर्यंत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात विविध कामे करणारे कुडाळकर नंतर पुन्हा मैदानात उतरणार आहेत. 

मुंबई : कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून ते कालच रुग्णालयातून घरी परतले आहेत. काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा नव्या जोमाने कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होणार आहे.  

दहा बारा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यावर कुडाळकर घरी आले आहेत. त्यांना आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. जून अखेरपर्यंत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात विविध कामे करणारे कुडाळकर नंतर पुन्हा मैदानात उतरणार आहेत. 

लॉकडाऊनकाळात विभागातील पक्ष पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांसह कुडाळकर सर्वत्र फिरत होते. गरजूंना धान्यवाटप, आरोग्यशिबिरे, गोळ्यांचे वाटप, विभागातील कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यापासून घरी परत आणण्यापर्यंतची मदत, सील केलेल्या परिसरातील लोकांना अत्यावश्यक बाबी मिळण्यासाठीची व्यवस्था, तेथील लोकांच्या चाचण्या, गरीब मजुरांना दोन महिने जेवणवाटप, स्थलांतरित मजुरांना गावी पाठविण्यासाठी बस-रेल्वेची व्यवस्था, कोरोना योद्ध्यांना साहित्यवाटप आदी कामे केली. अशातच त्यांना कोठेतरी संसर्ग झाला व 28 जूनपासून त्यांना घशात खवखव आणि ताप सुरु झाला. दोन दिवसांनंतरही ताप असल्याने ते प्रथम चेंबूरच्या रुग्णालयात गेले. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळल्यावर तेथून मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु केले. जास्तीत जास्त आराम, गरम पाणी, औषधे या बाबी सुरु झाल्या. चार दिवसांत ताप उतरून बरे वाटू लागले. 11 तारखेला सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याने घरी पाठविण्यात आले.  लोकांच्या आशीर्वादाने व त्यांनी धीर दिल्याने आपण बरे झालो, मात्र कोरोनाविरुद्धचे आपले युद्ध लवकर संपणार नाही. त्यामुळे सर्वांची काळजी घेऊनच आपल्याला व्यवहार करावे लागतील. सध्यादेखील घरी राहून लोकांना मदत करणार, तसेच आपल्या संपर्क कार्यालयातूनही लोकांना मदत होतच राहील, असेही त्यांनी सांगितले.

सचिन पायलट यांना काँग्रेसचे आवाहन
जयपूर : राजस्थानमधील काँग्रेस सरकार पुर्णपणे स्थिर आहे. या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकारला पाच वर्षे पुर्ण करेल, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि सहकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींचे दरवाजे कायम उघडे आहेत. त्यांनी चर्चा करून तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट नाराज होवून दिल्लीला गेल्याने कालपासून अशोक गेहलोत सरकार अस्थिर आहे. पायलट यांनी आपल्याबरोबर 25 ते 30 आमदार असल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे गेहलोत सरकारचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख