मोठी बातमी : हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांचा १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

ठाकरे सरकारमधील ईलेव्हनमध्ये राखीव खेळाडूंची यादी वाढत चालली आहे.
 Hasan Mushrif, Kirit Somaiya .jpg
Hasan Mushrif, Kirit Somaiya .jpg

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकार विरोधात चांगलीच आघाडी उघडली आहे. ठाकरे सरकारमधील विविध मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना जेरीस आणले आहे. मात्र, आज  (ता. १३ सप्टेंबर) सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील एका ग्रामवीकस मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांनी काल बाहेर काढणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. (Kirit Somaiya's allegation against Hasan Mushrif) 

यावेळी सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकारमधील ईलेव्हनमध्ये राखीव खेळाडूंची यादी वाढत चालली आहे. आज यामध्ये हसन मुश्रीफ यांचे नाव वाढवत आहोत. मुश्रीफ परिवाने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या आहेत. आमच्याकडे २७०० पेजेसचे पुरावे आहेत. हे मी आयकर विभागाकडे दिले आहेत. नामित मुश्रीफ आणि हसन मुश्रीफ यांनी ११ कंपन्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला आहे.   

त्यावेळी त्यांनी सांगितले की शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री अशा 2 मंत्र्यांच्या घोटाळ्यांची फाईल हाती लागली आहे. त्यामध्ये आज हसन मुश्रीफ यांचा 127 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. तर एका मंत्र्यांचा भ्रष्टाचार पुढच्या आठवड्यात उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला. याबाबत सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्याकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

सोमय्या यांनी सांगितले, की मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँडरिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते, असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. 

निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. श्रीमती सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत. २००३ ते २०१४ या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. या कारखान्याच्या नावावर जमा झालेल्या रकमा मरुभूमी फायनान्स कडून १५. ९० कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सी कडून ३५. ६२ कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपी कडून ४.४९ कोटी, नवरत्न असोसिएट्स कडून ४. ८९ कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस कडून ११.८५ कोटी, माऊंट कॅपिटल कडून २.८९ कोटी.     

उद्या मुंबई ईडीकडे तक्रार करणार आहे. त्यांना पुरावे देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालय कडे पुरावे देणार आहे. ठाकरे सरकारच्या ११ खेळाडूंमध्ये राखीव खेळाडूमध्ये वाढ होणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.      
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com