तक्रारीची दखल घेत नसल्याने; सोमय्या यांचे पोलिसांच्या विरोधात आंदोलन - Kirit Somaiya's agitation in front of the police station | Politics Marathi News - Sarkarnama

तक्रारीची दखल घेत नसल्याने; सोमय्या यांचे पोलिसांच्या विरोधात आंदोलन

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 16 मे 2021

सोमय्या यांनी सांगितले की गेल्या 4 महिन्यात तीसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. 

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट (Kirit Somaiya) सोमय्या यांना 1 जून पासून घरा बाहेर पडू देणार नाही, अशी धमकी देण्यात आली आहे. सोमय्या यांनी सांगितले की गेल्या 4 महिन्यात तीसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. (Kirit Somaiya's agitation in front of the police station )

या बाबत तक्रार करून ही मुंबई पोलिस काहीही कारवाई करीत नाहीत, असा आरोप करत सोमय्या यांनी नवघर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, महामंत्री संजय उपाध्याय, पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे इत्यादी नेते मंडळी उपस्थित होती.

कोरोनाबाधित सर्वाधिक मान्य; पण शेकडो मृतदेह नदीत सोडण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही

किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर मोठ्या प्रमाणात आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरही आरोप केले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांची भेट घेत परब यांच्याबाबत तक्रार नुकतीच तक्रार केली आहे. ही तक्रार दापोलितील परब यांच्या रिसॉर्टबाबत आहे. परब यांनी हा रिसॉर्ट काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला होता. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी याबाबत ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त; शरद पवार
 

या संदर्भात किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की ''पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा ( काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे'', असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख