साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्या अडचणी वाढणार

सोमय्या यांच्या तक्रारी नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
Kiriti Somaiya, Anil Parab .jpg
Kiriti Somaiya, Anil Parab .jpg

रत्नागिरी :  मुरुडमधील साई रिसॅार्ट प्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय पर्यावरण समितीकडून पाहणी झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) बुधवारी रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. (Kirit Somaiya will meet the Collector in Sai Resort case)

सोमय्या यांच्या तक्रारी नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या चौकशीचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची भेट घेणार आहेत. त्यांच्या सोबत माजी खासदार निलेश राणेंही असणार आहेत. 

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी यापूर्वी साई रिसॅार्टच्या खरेदी खताबाबत आरोप केले होते. त्यानंतर साई रिसॉर्टवर शनिवारी (ता.१२ जून) केंद्रीय पथक दाखल झाले होते. त्यांनी या परिसराची संपूर्ण पाहणी केली,सोमय्या यांच्या तक्रारीनंतर परब यांच्या साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. 

मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर आहे. सीआरझेड कायद्याचे (law of CRZ) उल्लंघन केले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, करत परब यांनी पदाचा दुरुपयोग केला, असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले होते.  

सोमय्या यांनी रविवारी एक ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हटले होते की ''अनील परब हे "साई रिसॉर्ट दापोली" चे मालक आहेत. त्यांनी मुरुड ग्रामपंचायत कडे अर्ज करुन जमीन आपल्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. त्यांनी विभाश साठे यांच्याकडून मालमत्ता सर्वेक्षण क्रमांक ४४६ खरेदी केली. हे अनिल परब यांना हस्तांतरित हाऊस नंबर 1074 होते. त्यांनी मालमत्ता कर व वीज उपकर 4 हजार 680 रुपये भरला आहे. त्याचा पावती क्रमांक 40 आहे.'' असे सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्या सोबतच त्यांनी कर पावती आणि अर्जही पोस्ट केला आहे. 
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com