सोमय्या यांना माफी मागण्यासाठी उरलेत 48 तास!

माझ्यावरील आरोप पुराव्यासह सिद्ध करा अन्यथा ७२ तासांत माफी मागा, नाहीतर मला पुढची कारवाई करावी लागेल आणि ती मी करेन,
सोमय्या यांना माफी मागण्यासाठी उरलेत 48 तास!
kirit somaiyya sarkar.jpg

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आपल्या वकील सुषमा सिंग यांच्याकडून भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit somaiyya)यांना नोटीस पाठवली आहे. माझ्यावरील आरोप पुराव्यासह सिद्ध करा अन्यथा ७२ तासांत माफी मागा, नाहीतर मला पुढची कारवाई करावी लागेल आणि ती मी करेन, असा इशारा त्यांनी मंगळवारी (ता. 14) दिला होता.

या इशाऱ्यावर परब हे आजही ठाम होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना या इशाऱ्याचा पुनरूच्चार केला. त्यामुळे सोमय्या यांना माफी मागण्यासाठी आता ४८ तासच उरले आहेत. या पुढील ४८ तासांत सोमय्या  कोणते पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोमय्या हे आज नवी दिल्लीत होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील तक्रारी देण्यासाठी त्यांनी ईडी, प्राप्तिकर विभागी, अर्थमंत्रालय येथे भेटी दिल्या. त्यांनी परब यांच्या इशाऱ्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ते माघार घेण्याची शक्यता कमी असल्याने परब विरुद्ध सोमय्या असा सामना न्यायालयात देखील रंगण्याची शक्यता निर्णाण झाली आहे. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगसह १० वेगवेगळे आरोप केले आहेत. तसेच. अनिल परब यांनी केलेल्या घोटाळ्यांची माहिती सक्तवसूली संचलनालय आणि आयकर विभागाला दिली असल्याचेही त्यांनी म्हटले होते. दापोलीला अनधिकृत 10 कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओमध्ये बदल्यांचा घोटाळा, सचिन वाझेचे मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, एसटी  महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, असे अनेक आरोप किरीट सोमय्या यांनी लावले होते. तसेच, अशा अनेक घोटाळ्याबाबत त्यांची  चौकशी अनिल परब यांच्या विरोधात सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in