एका अनिलनंतर दुसरा अनिलही फरार होणार!   

उद्धवा अजब तुझे सरकार
 Kirit Somaiya .png
Kirit Somaiya .png

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या विरोधात लूकाआउट नोटीस काढण्यात आली आहे. तर त्यांचा शोध विविध यंत्रणा घेत आहेत. त्यावरुन भाजपचे माजी खासदर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  (Kirit Somaiya criticizes Anil Parab)   

या संदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, उद्धवा अजब तुझे सरकार, गृहमंत्री अनिल देशमुख फरार, पोलिस आयुक्त परमबीर सिंग फरार. पुढे अनिल परब होणार, अशा शब्दात सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  

दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने (ED) आतापर्यंत ५ वेळा समन्स बजावूनही ते ईडीसमोर हजर न झाल्याने त्यांना अखेर लूकआऊट नोटीस जारी करण्यात केली आहे. तर परमबीरसिंग यांच्या विरोधातही ठाणे पोलिसांनी लुकाआउट नोटीस जारी केली आहे. तर परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंत ४ गुन्हे FIR नोंदवण्यात आले आहेत. यातील ३ गुन्हे वसूलीचे तर १ गुन्हा अँट्रोसिटीचा आहे.  चांदिवाल समितीने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह विरोधात जारी केलेल्या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी चंदीगढला गेलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या(cid) पथकाला सिंग तेथील घरी सापडले नाहीत.  

अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या चांदिवाल समितीने वारंवार समन्स बजावूनही अनुपस्थित राहणा-या परमबीरसिंग यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केला होता. चांदिवाल समितीने हे वॉरंट जारी करून त्याची अंमलबजावणी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत करण्याचे निर्देश राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहे. 

परिवहन मंत्री अनिल परब यांचेही नाव अनिल देशमुख प्रकरणात घेण्यात आले होते. त्यांच्या साई रिसॅाट वरुनही त्यांच्यावर आरोप केले आहे. तर परिवहन विभागातील भ्रष्टाचारावरुनही त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तर त्यांनाही चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता अनिल परब फरार होणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. अनिल परब यांनी सोमय्या यांना १०० कोटींच्या अब्रुनूकसानीचा दावा दाखल करण्याची नोटीस पाठवली आहे.   

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com