साई रिसॉर्टचे मालक अनिल परबच!     

मुरुडमधील साई रिसॅार्ट प्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
 Anil Parab .jpg
Anil Parab .jpg

रत्नागिरी :  मुरुडमधील साई रिसॅार्ट प्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर विविध आरोप केल आहेत. त्यातच त्यांनी आता या साई रिसॅार्टचे माल हे अनिल परबच असल्याचे म्हटले आहे.  (Kirit Somaiya claims that the owner of Sai Resort is Anil Parab)

त्यांनी या सदर्भात ट्वीट केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ''ग्रामपंचायत व महावितरणच्या नोंदी दापोली साई रिसॉर्टचे मालक अनिल परब आहे.'' असा दावा सोमय्या यांनी केला आहे. याबाबत सोशल मीडियावर या नोंदणीची कागदपत्र टाकत त्यांनी हा दावा केला आहे. 

दरम्यान, सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर विविध आरोप करत त्यांना घायकुतीला आणले आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी ईडीकडुन सुरु आहे. त्याचा पाठपुरावाही सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता सोमय्या यांनी अनिल परब यांच्या साई रिसॅार्टच्या प्रकरणाचा पाठपुरावा सुरु केला आहे. 

सोमय्या यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, सोमय्या यांनी यापूर्वी साई रिसॅार्टच्या खरेदी खताबाबत आरोप केले होते. त्यानंतर साई रिसॉर्टवर शनिवारी (ता.१२ जून) केंद्रीय पथक दाखल झाले होते. त्यांनी या परिसराची संपूर्ण पाहणी केली, सोमय्या यांच्या तक्रारीनंतर परब यांच्या साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. 

सोमय्या यांनी या आधीही एक ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हटले होते की ''अनील परब हे "साई रिसॉर्ट दापोली" चे मालक आहेत. त्यांनी मुरुड ग्रामपंचायत कडे अर्ज करुन जमीन आपल्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगितले आहे. त्यांनी विभाश साठे यांच्याकडून मालमत्ता सर्वेक्षण क्रमांक ४४६ खरेदी केली. हे अनिल परब यांना हस्तांतरित हाऊस नंबर 1074 होते. त्यांनी मालमत्ता कर व वीज उपकर 4 हजार 680 रुपये भरला आहे. त्याचा पावती क्रमांक 40 आहे.'' असे सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्या सोबतच त्यांनी कर पावती आणि अर्जही पोस्ट केला होता.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com