अनिल परब यांचे रिसॉर्ट पडणार म्हणजे पडणार!   - Kirit Somaiya claimed that Anil Parab's resort would fall. | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल परब यांचे रिसॉर्ट पडणार म्हणजे पडणार!  

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जून 2021

सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले होते.

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विविध आरोप केले आहेत. अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडले जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  (Kirit Somaiya claimed that Anil Parab's resort would fall)

त्या संदर्भात सोमय्या यांनी गुरुवारी (ता. १० जुन) एक ट्वीट करत म्हटले आहे. की पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी अनिल परब यांच्या साई रिसॉर्टला 2 दिवसात भेट देणार आहेत. आज मी दिल्ली येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोस्टल झोन अॅथॉरिटीच्या प्राथमिक अहवालानुसार साई रिसॉर्ट एनडीझेड (नो-डेव्हलपमेंट झोन) मध्ये आहे. त्यामुळे साई रिसॅार्ट पाडले जाईल, असा मला विश्वास असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.  

हे ही वाचा : जितिन प्रसाद यांच्यावर मोठी जबाबदारी; योगींनी दिले संकेत

सोमय्या यांच्या तक्रारीनंतर परब यांच्या साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसॉर्ट एनेक्सचे बांधकाम बेकायदेशीर आहे. सीआरझेड कायद्याचे (law of CRZ) उल्लंघन केले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, करत परब यांनी पदाचा दुरुपयोग केला, असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर साई रिसॅार्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत वस्तुस्थिती काय आहे. याची खातरजमा करण्याचे आदेश रत्नागिरीच्या अप्पर जिल्हाधिकारयांनी दिले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, दापोली प्रांताधिकारी हे याबाबत चौकशी अधिकारी असून त्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

साई रिसॉर्टचे बांधकाम करताना बिनशेती परवानगी, रस्ता, घरपट्टी आदींबाबत नियमांचे उल्लंघन करून केलेले आहे का याबाबतची वस्तूस्थिती तपासण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले होते. सोमय्या यांनी दापोली पोलिस स्टेशनला परब यांच्या साई रिसॅार्ट विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा :  केंद्रीय कृषिमंत्री शेतकऱ्यांशी चर्चेस तयार पण एका अटीवर...

दरम्यान, मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॅाम्बनंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची चौकशी CBI कडून सुरू आहे. या प्रकरणात परब यांचाही सहभाग असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. सोमय्या यांच्याकडून सातत्याने परब यांना लक्ष्य केले जात आहे. ते म्हणाले, ठाकरे सरकार कोरोना काळात केवळ भ्रष्टाचार करत आहे. आता अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा क्रमांक आहे. त्यांच्यावर अनेक प्रकरणांत घोटाळा केल्याचे आरोप आहेत. राज्यपालांनीही त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. विविध यंत्रणांमार्फत तपास सुरू आहे. त्यामुळे ते केवळ दोन महिन्यांचे पाहूणे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख