खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला; पण मी त्यांना सोडणार नाही : दमानिया 

यापुढील काळातील पत्रकार परिषदेत माझे नाव घ्याल, तर मी तुम्हाला सोडणार नाही.
Khadse persecuted me the most; But I will not leave them: Damania
Khadse persecuted me the most; But I will not leave them: Damania

मुंबई : आमचा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात होता. तो लढा मी अजित पवार, नितीन गडकरी, एकनाथ खडसे, छगन भुजबळ यांच्याविरोधातही दिला. मात्र, माझा कोणीही एवढा छळ केला नाही. तेवढा खडसेंनी माझा छळ केला. पुन्हा पुन्हा त्रास दिला. सहा जिल्ह्यांत माझ्याविरोधात 32 ठिकाणी केसेस केल्या. दोन खोटे एफआरआय केले, ते रद्द करण्यासाठी मला 16 वेळा औरंगाबादला फेऱ्या माराव्या लागल्या, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, यापुढील काळातील पत्रकार परिषदेत माझे नाव घ्याल, तर मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी बोलताना खडसे यांना दिला. 

भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यातून मी आताच निर्दोष सुटलो आहे, असे सांगितले होते. दमानिया यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत त्याला उत्तर दिले. 

एकनाथ खडसे यांनी काल केलेला दावा खोटा आहे, त्यांच्याविरोधातील विनयभंगाचे प्रकरण अजून चार्जशीट झालेले नाही, त्यामुळे हे प्रकरण कसे संपले, असा प्रश्‍न दमानिया यांनी उपस्थित करत खडसे हे खोटे बोलत आहेत, असा आरोपही त्यांच्यावर केला. 

एकनाथ खडसे हे त्यांच्या वाढदिवसी माझ्याबद्दल अश्‍लील बोलले. वाट्टेल ते बोलले. त्यामुळे त्यांच्याविरोधात मी एफआयआर दाखल केला. त्या एफआयआरवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे काहीही झालं नाही. फडणवीसांनी या प्रकरणात सोयीचे राजकारण केले, असा आरोप दमानिया यांनी फडणवीस यांच्यावरही केला. 

खडसे माझ्याविरोधात जेवढे बोलतील, तेवढी मी त्यांच्याविरोधात खंबीरपणे लढणार आहे. मी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय सोडणार आहे. याद राखा, यापुढे माझ्यावर आरोप केले, तर मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्याहून वाईट कोणी नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा दमानिया त्यांनी खडसे यांना दिला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com