मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा पलटवार; म्हणाले...

कर्नाटकमध्ये राहणारे सर्वजण कन्नडिगाच आहेत. उगाचच वाद निर्माण करणे, चुकीचे आहे, असेकर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी म्हटले आहे.
Karnatak Dy CM AshwathNarayan slams CM Uddhav thakerey over Belgaon issue
Karnatak Dy CM AshwathNarayan slams CM Uddhav thakerey over Belgaon issue

मुंबई : बेळगावच्या नामांतरावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण यांनी पलटवार केला आहे. कर्नाटकमध्ये राहणारे सर्वजण कन्नडिगाच आहेत. उगाचच वाद निर्माण करणे, चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज 'महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर टीकास्त्र सोडले होते. बेळगाव सीमावादाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये असूनही कर्नाटक सरकारने बेळगावचे नामांतर केले. हा उर्मटपणा आहे. हे सरकार बदललेल्या नावाप्रमाणेच बेलगाम असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला होता. 

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टीकेला अश्वथ नारायण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, कर्नाटकमध्ये राहणारे सर्वजण कन्नडिगा आहेत. मराठी भाषिकांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण करणारे आमचे एकमेव राज्य आहे. विनाकारण वाद निर्माण करणे चुकीचे आहे. आपण सर्व भारतीय आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

वादग्रस्त भूभाग केंद्रशासित करा...

दरम्यान, पुस्तक प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वादग्रस्त भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी केली. ते म्हणाले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. सीमावादाचा प्रश्न न्यायालयात आहे. तरीही कर्नाटक सरकारने बेळगावचे नाव बदलले. हा सरकारचा उर्मटपणा आहे. हे प्रकरण न्यायालयात असेपर्यंत वादग्रस्त भूभाग केंद्रशासित का केला जात नाही? असे म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वादग्रस्त भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी केली. तसेच आता रडकथा थांबवून पूर्वीची धग दिसली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

सीमाभागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या कानडी अत्याचाराचा आम्ही विरोध करत राहणार आहे. कर्नाटक सरकारल बेलगाम वागत आहे. आता सीमाभाग परत मिळविणारच आहे. यावर राज्यातील सर्व पक्ष एकत्रित आहेत. एकीकरण समितीतील एकजूट तुटली कशी? असा सवाल उपस्थित करून त्यांनी मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com