कंगनाचा बंगला सील, बांधकामाची 24 तासांत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

महापालिकेच्या एच पश्‍चिम प्रभागाच्या इमारत कारखाने विभागाच्या पथकाने या बंगल्याला सोमवारी भेट देऊन पुन्हा पाहणी केली.
कंगनाचा बंगला सील, बांधकामाची 24 तासांत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत हिच्या पाली हिल येथील बंगल्यातील कथित बेकायदा बांधकामाबाबत महापालिकेने आज नोटीस पाठवून बंगला तो सील केला. तिच्या कर्मचाऱ्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर पालिकेच्या पथकाने नोटीस भिंतीवर चिकटवली. 

24 तासांत बंगल्यामध्ये सुरू असलेल्या कामाच्या परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची मुदत यामध्ये तिला देण्यात आली आहे. तिने 24 तासांत पुरावे सादर न केल्यास पालिका हे बांधकाम बेकायदा ठरवून तोडू शकते.

महापालिकेच्या एच पश्‍चिम विभाग कार्यालयाकडे 2018 मध्ये कंगनाच्या बंगल्याबाबत तक्रार आली होती. त्यानंतर पालिकेने तिला नोटीसही पाठवली होती. या नोटिशीला तिने दिंडोशी न्यायालयात आव्हान दिले असून न्यायालयाने तेव्हा पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे; तर तिच्या बंगल्यात कार्यालय तयार करण्याचे काम सुरू होते. 

महापालिकेच्या एच पश्‍चिम प्रभागाच्या इमारत कारखाने विभागाच्या पथकाने या बंगल्याला सोमवारी भेट देऊन पुन्हा पाहणी केली. त्यानंतर आज पुन्हा सुधारित नोटीस देण्यात आली असून बंगलाही सील करण्यात आला आहे.

हा बंगला निवासी असल्याने त्यात कार्यालय सुरू करण्यासाठी रीतसर परवानगी घेणे गरजेचे होते. पालिका अधिनियम 354 (अ) अंतर्गत कोणत्याही निवासी जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही, असेही या नोटिशीत नमूद आहे.

या बंगल्यामध्ये चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. काही ठिकाणी वाढीव बांधकामही करण्यात आले आले; तर पूर्वीची दोन बांधकामे जोडण्यात आली आहेत. तसेच अंतर्गत बदलही करण्यात आले आहेत. यात स्वच्छतागृह तोडून त्या जागी कार्यालय बांधण्यात आले आहे. तसेच परवानगी न घेता नवे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे, असे प्रथमदर्शनी दिसते.

बंगल्यात बेकायदा बदल?
कंगनाच्या बंगल्यात काही बेकायदा बदल आणि कायद्याचे उल्लंघन करून नियमबाह्य चटई क्षेत्र वापरण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे 24 तासांत सर्व कागदपत्रे सादर न केल्यास पालिकेकडून बेकायदा बांधकाम हटविण्याची कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com