कंगना, ती व्यक्ती मुलींसाठी खूपच धोकादायक 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अभिनेत्री कंगना रनौट सातत्याने परखड भाष्य करत आहे. त्यामुळे ती कायम प्रकाशझोतात असते. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबई पोलिसांबाबत असेच विधान केले होते. "आपल्याला आता मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय,' असे सांगत मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता.
Kangana, that person is very dangerous for girls
Kangana, that person is very dangerous for girls

मुंबई : "कंगना, तू ज्या व्यक्तीचे आभार मानत आहेस, त्या व्यक्तीलाच तू घाबरायला हवं. कारण, ती व्यक्ती मुलींसाठी खूप धोकादायक आहे,' अशा शब्दांत कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अभिनेत्री कंगना रनौट सातत्याने परखड भाष्य करत आहे. त्यामुळे ती कायम प्रकाशझोतात असते. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबई पोलिसांबाबत असेच विधान केले होते. "आपल्याला आता मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय,' असे सांगत मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. 

भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्‌विटवर कंगना राणावत हिने भूमिका मांडली होती. तत्पूर्वी कंगनाला सुरक्षा पुरवण्यावरून आमदार कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते. पण, कंगनाला सल्ला देण्याच्या नावाखाली कॉंग्रेसने आमदार राम कदम यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले आहे. 

कंगना हिला तातडीने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी कदम यांनी ट्‌विटच्या माध्यमातून केली होती. त्याला उत्तर देताना कंगना तिने म्हटले होते की, "आता मला मूव्ही माफिया, गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटायला लागली आहे. मला हिमाचल प्रदेश पोलिसांची अथवा केंद्र सरकारची सुरक्षा द्यावी, प्लीज...मुंबई पोलिसांची सुरक्षा नको,' अशी मागणी तिने ट्विटद्वारे केली होती. 

त्यावरून नेहमीप्रमाणे राजकीय वादळे उठली आहेत. काहींनी कंगनाला महाराष्ट्र सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही कंगनाचे ट्‌विट रिट्‌विट करत सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "कंगना, तू ज्यांचे आभार मानते आहेस, त्या व्यक्तीला तू घाबरायला हवे; कारण ती व्यक्ती मुलींसाठी अत्यंत धोकादायक आहे.' 

दरम्यान, यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांबाबत विधान केले होते. त्या वेळीही राज्यात राजकीय गदारोळ उठला होता. 

हेही वाचा : पेडणेकरांचे पुत्र संचालक असलेल्या कंपनीच्या पत्त्यावर नऊ कंपन्यांची नोंद 

मुंबई : कोविड केंद्रात मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट मिळालेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पुत्राशी संबंधित कंपनी आता नव्याने अडचणीत सापडण्याची शक्‍यता आहे. किश कॉर्पोरेट सव्हिसेस या कंपनीची नोंदणी ज्या पत्त्यावर आहे, त्याच पत्त्यावर इतर आठ कंपन्यांची नोंदणी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या सर्व कंपन्या बोगस असण्याची शक्‍यता असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंद गोमती जनता सोसायटी, जी. के. कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई 400013 या पत्त्यावर आहे. या कंपनीत महापौर पेडणेकर यांचे पुत्र संचालक असून याच कंपनीला वरळी येथील कोविड केंद्रासाठी मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट मिळालेले आहे. 

याच पत्यावर इतर आठ कंपन्यांचीही नोंदणी करण्यात आली आहे. या सर्व बोगस कंपन्या असण्याची शक्‍यता आहे, असा दावा सोमय्या यांनी केला. या प्रकरणी राज्य सरकारकडे तक्रार केली आहे. या संदर्भातील मालकी हक्क आर्थिक हितसंबंध, व्यवहारातील पारदर्शकता याबाबत खुलासे व्हायला हवेत, अशी मागणी माजी खासदार सोमय्या यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com