सचिन सावंतांना कंगनाने केले 'ब्लॉक' 

कंगना रनौटने स्वतः ड्रग घेत होती, अशी कबुली दिल्याची एक चित्रफित सावंत यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली होती.
Kangana 'blocks' Sachin Sawant on Twitter
Kangana 'blocks' Sachin Sawant on Twitter

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रगमाफियांचा पर्दाफाश करण्याची आरोळी देणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौट हिने कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांना ट्विटरवर ब्लॉक केले आहे. 

कंगना रनौटने स्वतः ड्रग घेत होती, अशी कबुली दिल्याची एक चित्रफित सावंत यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली होती. यावर कंगना कोणाकडून ड्रग विकत घेत होती? असा सवाल करण्यात आला आहे. 

याशिवाय, कंगनाला ड्रगपुरवठा करणाऱ्याची माहिती मिळावी, यासाठी कंगनाचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. या प्रकाराने कंगनाची अडचण झाल्याचा दावा करत सावंत यांनी, तिने का ब्लॉक केले?, असा सवाल उपस्थित केला आहे. 

कदम-सावंतांमध्ये ड्रगवरून रंगलेला वाद 

दरम्यान, विवेक मोईत्रा (भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे तत्कालिन स्वीय सहाय्यक) यांच्यापासून आमदार राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी. तसेच, भाजप कार्यालयात 53 वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील,'' अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे केली आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगनाने बॉलिवूडमधील ड्रग माफियांविरोधातही तिने भाष्य केले होते. त्यानंतर एक ट्विट करत तिने संरक्षणाची मागणी केली होती. कंगनाच्या या ट्‌विटवर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी तिची पाठराखण केली होती. 

दरम्यान, सचिन सावंत यांच्या मागणीवर मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, तुमचे मंत्री टेस्ट करतील काय? असा सवाल करत प्रत्त्युत्तर दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मी मावळा आहे. मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. मी तयार आहे. पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायला तयार आहेत का? ते अगोदर तपासून पहा,' असे आव्हान कदम यांनी सावंत यांना दिले होते. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बडे नेते अभिनेते आणि ड्रग माफिया यांना महाराष्ट्र सरकारचा वाचवण्याचा प्रयत्न संपूर्ण देश दुनियाने पाहिला आहे. या कालखंडात आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिलीं हेच सरकारच्या जिव्हारी लागले, असेही कदम यांनी त्या वेळी म्हटले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com