२०२२ चा कुंभमेळा २०२१ मध्ये घेतला; मग कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेणार का?

कुंभमेळा सुरू होण्याच्या तोंडावरच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे कुंभमेळा रद्द करण्याची मागणी झाली. मात्र, त्याला नकार देण्यात आला.
Jitendra Awhad  .jpg
Jitendra Awhad .jpg

मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत कुंभमेळ्याच्या आयोजनावरुन वाद सुरु आहे. तो वाद अजूनही थांबलेला नाही. राजकीय नेत्यांसह अनेक कलाकारांनीही कुंभमेळ्याच्या आयोजनावर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर कुंभमेळा प्रातिनिधिक स्वरूपात होत आहे. यावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुंभमेळा सुरू होण्याच्या तोंडावरच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे कुंभमेळा रद्द करण्याची मागणी झाली. मात्र, त्याला नकार देण्यात आला. कुंभमेळ्यात लाखो भाविक एकत्र आल्याने अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे अनेक आखाड्यांनी कुंभमेळा समाप्त झाल्याची घोषणा केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर प्रातिनिधिक स्वरूपात कुंभमेळा पार पडला. 

त्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये आव्हाड म्हणाले, ''कुंभ हा दर 12 वर्षांनी येतो... मग 2022 ला येणारा कुंभमेळा 2021 मध्ये का घेतला... केंद्र सरकारनी व राज्य सरकारनी त्याला मान्यता का दिली...कोरोनाचा झालेला प्रसाराची व त्यामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेणार का...महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे अभिनंदन...असे आव्हाड यांनी म्हटले आहे. 

या ट्विटमध्येच आव्हाडांनी नेपाळचे पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र वीर विक्रम शाह देव आणि राणी कोमल यांना कोरोना झाल्याचे म्हटले आहे. ते हरिद्वामधील महाकुंभमेळ्याला उपस्थित होते, असंही आव्हाड यांनी सांगितले. या ट्विटमध्ये आव्हाडांनी राजे ज्ञानेंद्र यांचा फोटोही शेअर केला आहे. 

देशात गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला २१ लाख ५७ हजार ५३८ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com