रश्मी शुक्ला रडत म्हणाल्या होत्या..."मला माफ करा.." - jitendra awhad allegations on rashmi shukla in phone tapping case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

रश्मी शुक्ला रडत म्हणाल्या होत्या..."मला माफ करा.."

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी कॅाग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट करीत आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केला आहे. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांची शिकवण विसरलं, असं म्हटलं आहे. 

"सरकारकडून आपण खूप मोठ्या ह्रदयाचे आहोत, हे दाखवण्याची चूक झाली. शिवाजी महाराजांचं तत्व होतं, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरलं होतं", असं ते म्हणाले. "सगळ्या चुका करून जर रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव गृहसचिव यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा म्हणाल्या. माझे पती नुकतेच वारले आहेत असं म्हणाल्या, तर कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटतोच. पण हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे लक्षातच आलं नाही”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

हेही वाचा : रश्मी शुक्लांच्या काळातील पुण्याच्या 'त्या' प्रकरणाची पुन्हा चर्चा!
 
पुणेः राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपींगच्या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्‍मी शुल्का यांच्यावर गंभीर आरोप सत्ताधारी पक्षातील मंत्री करत आहेत. त्यानिमित्ताने रश्‍मी शुक्ला या पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी त्यांच्या नावाने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. यामध्ये शुक्ला यांनी पीआय धुमाळ यांना निलंबित केले होते.  आयपीएस (IPS) अधिकारी के. के. पाठक सेवानिवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांच्याकडे पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची (Pune Police) सूत्रे आली होती. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षकांची बैठक घेतली. या पहिल्याच बैठकीत ‘ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, भ्रष्टाचार होत असेल, तर त्याला पोलिस निरीक्षक जबाबदार असेल’ असा दम भरला होता.यामुळे शहरात पोलिसांसाठी आनंददायी नाही पण नागरिकांसाठी तरी खुशालीचे वातावरण निर्माण होईल असे वाटले होते. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी घेऊन थेट माझ्याकडे यावे असे आवाहन करत त्यांचा मोबाईल क्रमांक भर कार्यक्रमांमधून पुणेकरांसमोर जाहीर केला होता. त्यामुळे आयुक्त शुक्लांबद्दल अतिशय चांगले वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आयुक्तालयात महिला, ज्येष्ठ नागरिकांसह, व्यावसायिक, जमीनदार यांची गर्दी वाढायला लागली होती. त्यांची दखल घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना शुल्का यांच्याकडून दिले जात होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख