जयंत पाटील म्हणाले, "" प्रथम मराठी त्यानंतर तूम्ही !'' 

पाटील म्हणाले, की आम्ही पक्षात खडसेसाहेबांचे स्वागत करीत आहोत.
जयंत पाटील म्हणाले, "" प्रथम मराठी त्यानंतर तूम्ही !'' 

पुणे : " भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला आहे. त्यांचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होणार आहे,'' अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी भाजपला मारली आहे. 

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची माहीती देण्यासाठी पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी खडसे यांनी भाजपला दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. खडसे यांच्या पाठोपाठ हळूहळू आणखीही नेते पक्षात येतील. आताच नाव उघड करणार नाही अशी माहीती जयंत पाटील यांनी दिली. 

काहीवेळापूर्वीच खडसे यांनी सामला सांगितले होते, की मी सकाळी मुंबईच्या दिशेने निघणार आहे. राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मुहूर्त राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे ठरवतील अशी माहीती भाजपचे ज्येष्ठ नाराज नेते एकनाथ खडसे यांनी दिली होती. त्यानंतर काही वेळात पत्रकार परिषद घेऊन पाटील यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाची माहीती दिली. 

पाटील म्हणाले, की आम्ही पक्षात खडसेसाहेबांचे स्वागत करीत आहोत. त्यांनी गेल्या तीन दशकापासून भाजपमध्ये काम केले आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनी पक्ष वाढविला आहे. ते एक अभ्यासू नेते आहेत. पक्षात येत आहेत याचा निश्‍तितच आनंद आहे. त्यांच्यावर पक्ष कोणती जबाबदारी देणार असे विचारले असता ते म्हणाले, की आज प्रवेश आहे. कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय लवकरच होईल. भाजपने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. 

खडसे यांच्यासारखा नेता पक्ष सोडून का जात आहे याचे आत्मपरिक्षण भाजपने करावे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. खडसे यांच्या पक्ष प्रवेशाची माहीती मराठीत देत असताना मध्येच हिंदी भाषक पत्रकारांनी त्यांना खडसेंबाबत प्रश्‍न विचारण्यास सुरवात केली असता पाटील म्हणाले, की पहिले मराठी त्यानंतर तुम्ही. पाटील यांनी खडसे यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती मराठीत दिल्यानंतर त्यांनी हिंदीत खडसे यांच्या पक्षप्रवेशाची माहिती दिली. 

गेल्या काही दिवसापासून खडसे हे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होते. ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत होती. खडसे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचेही बोलले जात होते. 

कालही "साम'ने दिलेल्या बातमीत खडसे हे उद्या म्हणजे गुरूवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त दिले होते. मात्र खडसे यांनी आपण अद्याप भाजपमध्येच आहोत. अजूनही राजीनामा दिला नसल्याचे सांगितले होते. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊ भाजप सोडून कोठेही जाणार नाहीत असे सांगत होते. तसे मात्र होताना दिसत नाही. नाथाभाऊंनी भाजपला अखेर रामराम केला आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com