या भेटीमुळे महाराष्ट्राबद्दल दिल्लीचा आकस नक्कीच कमी होईल!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या पंतप्रधानांनशी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली.
 Prime Minister Narendra Modi, Chief Minister Uddhav Thackeray, Jayant Patil .jpg
Prime Minister Narendra Modi, Chief Minister Uddhav Thackeray, Jayant Patil .jpg

नवी दिल्ली : मराठा व ओबीसी आरक्षणासह राज्यातील विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. पण त्याआधी या दोघांमध्ये व्यक्तिगत भेट झाली. जवळपास अर्धा तास ही भेट झाल्याची चर्चा असून त्यावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य केले आहे. (Jayant Patil said this during a meeting between Uddhav Thackeray and Prime Minister Narendra Modi)

ते म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या पंतप्रधानांनशी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांची बैठक झाली, ही चांगली गोष्ट आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राबद्दल दिल्लीचा आकस नक्कीच कमी होईल. आम्हाला काहीच धोका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे सगळे विश्वासावर चालत असते. आमची कमिटमेंट ५ वर्षांची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. महाराष्ट्राच्या जनतेने हे सरकार मान्य केले आहे. 

त्यांची भेट झाली ही सकारात्मक बाब आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नानविषयी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकत्र भेटले ही चांगली गोष्टी आहे. राजकारणात व्यक्तीगत संबंध असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणालाही भेटले तर चर्चा होते. सत्तेत असो वा नसो व्यक्तीगत पातळीवर संबंध असतात. हे व्यक्तीगत नाते असते. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवताना पक्षाची भूमिका वेगळी असते, त्याचा व्यक्तीगत संबंधावर परिणाम होत नाही, असे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत पंतप्रधानांना भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेही उपस्थित होते. पण त्याआधी मोदी व ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली. राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेने दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे. सरकार स्थापनेवेळी मोठी राजकीय उलथापालथ झाली. भाजप व शिवेसनेच्या नेत्यांनी एकमेकांवर अनेक प्रहार केले. मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला होता.

राज्यातील भाजपच्या नेत्यांकडूनही सरकार फारकाळ टिकणार नाही, अशी वक्तव्ये सातत्याने केली जात आहेत. 100 कोटी खंडणीच्या मुद्यावरून अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावाचीही चर्चा असून त्यांना अटक होईल, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. बदली प्रकरणामुळेही सरकारची डोकेदुखी वाढली आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजची मोदी व ठाकरे यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com