डाॅ. शिंगणेंनी ठोके तपासले आणि ब्रीच कॅंडित जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा जयंतरावांना सल्ला! - Jayant Patil listened to the Chief Minister's order and went straight to Breach Candy hospital | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

डाॅ. शिंगणेंनी ठोके तपासले आणि ब्रीच कॅंडित जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा जयंतरावांना सल्ला!

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 जुलै 2021

पाटील यांची अॅंजिओग्राफी करण्याचा निर्णय.. 

मुंबई : जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना मंत्रीमंडळाच्या बैठकीतच त्रास सुरू झाल्याने त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची अॅंजिओग्राफी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

वाचा ही बातमी : एके काळी दोन खासदार असलेल्या पक्षाकडे आज देशाचे नेतृत्व

या बैठकीच्या वेळी नक्की काय घडले हे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. बैठक सुरू असताना पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. आपल्या हाताच्या नाडीचे ठोके तपासत असताना त्यांना एक ठोका चुकल्याचे जाणवले आणि ते सभागृहाबाहेर येऊन बसले. मंत्रीमंडळात पेशाने डाॅक्टर असलेले अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी पाटील यांचे ठोके तपासले. ते प्रतिमिनिट 66 असल्याचे त्यांनी सांगितले. माझा हार्टबिट रेट तेवढाच असल्याचे पाटील यांनी शिंगणे यांना सांगितले.  मी घरी जातो, असे जयंत पाटील म्हणत होते. तेवढ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तेथे आले आणि त्यांनी घरी न जाता तातडीने ब्रीच कॅंडीमध्ये जयंत पाटलांनी जावे, अशी सूचना केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर जयंत पाटलांनी ऐकणे स्वाभाविक होते. तेथे गेल्यानंतर त्यांच्य तपासण्या करण्यात आल्या. त्या तपासण्या नाॅर्मल आल्या. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. काळजी करण्याचे कारण नाही, असे आव्हाड यांनी सांगितले.

वाचा ही बातमी : राजकारणाची ही वेळ नाही, पवारांची सूचना योग्यच

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जयंत पाटील यांनी भेट घेतली. त्यांच्या पहिल्या आणि नंतरच्या ईसीजीमध्ये फरक दिसून आला आहे. ते आधीपासूनच रक्तदाबाने आधीपासूनच पीडित आहेत. यापूर्वी त्यांच्या एका वाहिनीत किरकोळ ब्लॉक आढळून आला होता. सध्या एक वाहिनीत ५० टक्के ब्लॉकेज असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उद्या (ता. 29) सकाळी १०-११ वाजता सर्वप्रथम अॅंजियोग्राफी केली जाईल. त्यानंतर अँजियोप्लास्टी करण्याची गरज भासली तर डॉक्टर त्याबाबत निर्णय घेतील, असे टोपेंनी सांगितले. सध्या ते ब्रीच कँडी रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. ते सर्वांशी बोलत आहेत, संवाद साधत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असेही  टोपे यांनी स्पष्ट केले.

याबाबत खुद्द जयंत पाटील यांनीही निवेदन प्रसिद्धीस दिले असून तब्येत व्यवस्थित असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख