जयंत पाटील, मुंडेंची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा नांदेडमधूनच मागे फिरणार!

डेल्टा प्लसच्या वाढत्या प्रभावामुळे अखेर राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा रद्द करण्यात आली अ
Sarkarnama Banner - 2021-06-28T085900.532.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-28T085900.532.jpg

नांदेड : राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संवाद साधण्यासाठी काढण्यात आलेली  राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा सध्या नांदेड जिल्ह्यात पोहचलेली आहे मात्र, डेल्टा प्लसच्या वाढत्या प्रभावामुळे अखेर राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वीय सहाय्यकांनी दिली.   Jayant Patil Dhananjay Munde NCP seminar yatra canceled 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संवाद साधण्यासाठी या यात्रेचे नियोजक केले होते. या यात्रेला सुरवातही झाली होती. पण सध्या राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेता ही यात्रा नांदेड जिल्ह्यात पोहचताच रद्द करण्यात आली आहे. यापुढील ही परिसंवाद यात्रा नांदेड जिल्ह्यातच थांबवून, राष्ट्रवादीचा हा परिसंवाद यात्रा मागे फिरणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.  

हेही वाचा : खासदार सुजय विखे यांची गुगली... तर आपण पुन्हा एकत्र येऊ!

नगर : यंदाच्या महापौर व उपमहापौर निवडीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आज (रविवारी) महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालण ढोणे यांना निरोप देण्यात आला. काँग्रेस वगळता सर्व पक्षीय नेत्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत शहराच्या विकासासाठी एकत्र आल्याचा राग आळवला. तसेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेळा आली, तर आपण पुन्हा एकत्र येऊ, सूचक वक्तव्य केले. त्यामुळे आगामी महापौर, उपमहापौर राष्ट्रवादीचे होणार का, अशी चर्चा सुरू आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणूक होऊन अडीच वर्षे उलटली आहेत. या अडीच वर्षांत शहरात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. भाजपला सत्तेत आणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळाली, तर सर्वाधिक नगरसेवक असूनही शिवसेनेला मात्र या पदापासून दूर ठेवण्यात आले. अडीच वर्षांनंतर महापौरपदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले. भाजपकडे या प्रवर्गाच उमेदवारच नाही. मात्र उपमहापौरपद खुले आहे, असे असूनही भाजप मात्र उपमहापौरपदाच्या निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवू पाहात आहे. यामागील भाजपची काही रणनीती आहे का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com