अंबानींच्या घरासमोर स्फोटके असलेली कार सोडणारी 'जैश-उल-हिंद' नेमकी आहे तरी काय  

प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या घराजवळ गुरुवारी (ता. 25 फेब्रुवारी) सायंकाळी संशयित गाडी आढळून आली होती.
Jaish-ul-Hind claimed responsibility for the car with explosives in front of Ambani house
Jaish-ul-Hind claimed responsibility for the car with explosives in front of Ambani house

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या घराजवळ गुरुवारी (ता. 25 फेब्रुवारी) सायंकाळी संशयित गाडी आढळून आली होती. त्या गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या होत्या. या गाडीची जबाबदारी जैश-उल-हिंद या संघटनेने घेतली आहे. 

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाबाहेरची स्फोटकांनी भरलेली गाडी 'फक्त एक ट्रेलर आहे. मोठे चित्र अजून समोर यायचे आहे' असे जैश-उल-हिंदने टेलिग्राम अ‍ॅपवरील मेसेजमध्ये म्हटले आहे. 'अंबानी यांच्या घराजवळ गाडी सोडणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे. 

जैश-उल-हिंदने बिटकॉईनच्या स्वरुपात पैसा मागितला आहे. 'तुम्हाला जमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा' असे तपास यंत्रणांना आव्हान देण्यात आले आहे. 'आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुमच्या मुलांच्या गाडीला आमच्या गाडीची धडक बसेल' अशी धमकी सुद्धा या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. 'तुम्हाला काय करायचे हे तुम्हाला माहित आहे. फक्त पैसे ट्रान्सफर करा' अशी धमकी देण्यात आली आहे.


जैश-उल-हिंद या संघटनेनेच दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. तेव्हापासूनच ही संघटना समोर आली आहे. जैश-उल-हिंद संघचनेचा हात असल्याचा पुरावा जोपर्यंत मिळाला नाही तोपर्यंत या तपासाबाबत कोणतेही निवेदन देणार नाही, तपास यंत्रणांना असा संशय आहे की, व्हायरल स्क्रीनशॉट हा तपास भ्रमित करण्याचा प्रयत्न असू शकतो, असे तपास यंत्रणांच्या सूत्रांनी सांगितले.  

जिलेटीन प्रामुख्याने भूसुरुंग स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येतात. या कारमध्ये एक पत्रही मिळाले होते. त्यात धमकीही देण्यात आली होती. या गाडीवर खोटा नंबर टाकण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी या कारच्या खऱ्या मालकाचा शोध लावला आहे. ही कार चोरून आणल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही कार चोरून आणल्याचे उघडकीस आले आहे. अंबानी यांना केंद्र सरकारने झेड प्लस ही सुरक्षा दिली आहे. तसेच त्यांची वैयक्तिक सुरक्षाव्यवस्थादेखील काटेकोर आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com