राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं : नवाब मलिक  - It would have been better if the governor had shown sympathy to Naik's family: Nawab Malik | Politics Marathi News - Sarkarnama

 राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं : नवाब मलिक 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

अर्णब गोस्वामी यांना काही दिवसापूर्वी अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे

मुंबई : गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपाल यांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं असे सांगतानाच एका आरोपीची बाजु घेणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. 

राज्यपाल यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामीला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला असून यावर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

या राज्यात प्रत्येक जेलमध्ये असणाऱ्या कैद्याच्या जीवाची किंवा आरोग्याची जबाबदारी सरकारची असते. जेलमधील कैद्याला नातेवाईकांना भेटण्यासही परवानगी दिली जात असते. परंतु ज्यापध्दतीने राज्यपाल एक विशेष कैदी असलेल्या अर्नव गोस्वामीला सहानुभूती दाखवतात. नाईक कुटुंब बरेच महिने न्यायासाठी भटकत होते त्यांची बाजू न घेता एका आरोपीची घेणे हे योग्य नसल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

हे ही वाचा 
अर्णब गोस्वामींच्या प्रकृतीची काळजी घ्या ! राज्यपाल 

रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीची आणि सुरक्षेतेची काळजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना लागून राहिली आहे. गोस्वामी यांची तशी काळजी घेतली जावी म्हणून त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. 

अर्णब गोस्वामी यांना काही दिवसापूर्वी अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी काल मोबाईल वापरल्याने त्यांना तळोजा तुरूंगात हलविण्यात आले आहे. आपल्या जिवीतास धोका आहे तसेच पोलिसांनी आपणास मारहाण केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. त्यांना अटक झाल्यापासून भाजप नेते गोस्वामीच्या मागे उभे राहिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते चंद्रकांत पाटील, राम कदम, किरीट सोमैय्या यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी गोस्वामी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आणि दिलेल्या वागणुकीचा निषेध केला आहे. राम कदम यांनी तर गोस्वामी यांच्या जिवीतास काही झाले तर राज्यातील आघाडी सरकार त्याला जबाबदार असेल असे म्हटले आहे. 

अर्णब गोस्वामीप्रकरणी आमदार राम कदम यांनी नुकतीच राज्यपाल कोश्‍यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. आज राज्यपालांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशीच चर्चा करून गोस्वामी यांच्या प्रकृतीची आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. तसेच गोस्वामींच्या नातेवाईकांना भेटू द्यावे असेही म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख