शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत संजय राऊतांचं महत्वाचं विधान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढील निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे.
It will create wonder if Shivsena and NCP have allaince in election says Sanjay Raut
It will create wonder if Shivsena and NCP have allaince in election says Sanjay Raut

मुंबई : महाविकास आघाडीतील काँग्रेसने स्वबळाची भाषा सुरू केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीने स्वबळाची भाषा केलेली नाही. हे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असे विधान त्यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी या दोन पक्षांना एकत्र लढावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. (It will create wonder if Shivsena and NCP have allaince in election says Sanjay Raut)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढील निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावतानाच शिवसेना व राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत दिले. राजकीय पक्षांना स्वबळाचं अजीर्ण झालं आहे. भाजप एकटाच असल्याने त्यांचं स्वागत आहे. नाना पटोले यांनीही स्वबळावर लढणार असल्याचे सांगितलं आहे, त्यामुळे त्यांचही स्वागत. राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष राहिले. आम्ही स्बबळाची भाषा केली नाही. दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढलले तर चमत्कार होईल, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

'सामना'च्या अग्रलेखातून टीका

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाचे अजीर्ण झालेले दिसते. कारण जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. सध्याच्या राज्यातील स्थितीतही काही लोकांना राजकारण, निवडणुका, स्बळाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके ग्रस्त असतील असे कधीच वाटले नव्हते. नाना पटोले हे एक झुंजार नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याची गर्जना केली आहे. मुख्यमंत्री कोण, हा संभ्रम त्यांच्या मनात दिसत नाही. त्यामुळे ते 2024 साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला सामानातील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे सूतोवाच

भाजपच्या जवळ जाईल व एकत्र लढतील असा पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही. त्यामुळे भाजपाला स्वबळावर लढणे अपरिहार्य आहे. आता महाराष्ट्रात राहता राहिले शिवसेना व राष्ट्रवादी हे दोनच पक्ष. सगळेच स्वबळावर लढत असतील तर या दोन पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल व त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी केलेच आहे. महाराष्ट्रात आधीच स्वबळाचे अजीर्ण झाले आहे. त्यात आणखी भर नको, असेही अग्रलेखात म्हटलं आहे. 

ज्याच्यापाशी 145 आमदारांचे बहुमत आहे त्याचे सरकार बनेल व त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे मत नानांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे, तेही खरेच आहे. 'मी पुन्हा येईन' असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. ते आले नाहीत. त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे 105 आमदारांचे बळ वाया गेले. त्यामुळे 2024 चा हवाला आता कोणीच देऊ नये. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आज तिसऱ्या स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोलेंनी पक्षातील कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण केला, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com