काय पायगुण हा या मुख्यमंत्र्यांचा? कधी नाही ते घडत आहे : राणेंची ठाकरेंवर टीका 

आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत.
It never happened, But now it is happening  : Rane criticizes Chief Minister Thackeray
It never happened, But now it is happening : Rane criticizes Chief Minister Thackeray

मुंबई : पावर ग्रीडमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका मुंबईला बसला, त्यामुळे सोमवारी (ता. 12 ऑक्‍टोबर) संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. मुंबईकरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. लोकल सेवाही ठप्प झाली होती. मुंबईबरोबरच ठाणे, अलिबागलाही त्याचा मोठा फटका बसला आहे. वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनीही ठाकरे सरकारचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केले आहे. 

नीतेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "काय पायगुण आहेत, या मुख्यमंत्र्यांचे. बसल्यापासून...जे कधीच झाले नाही, ते सगळं होत आहे..आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत...ते ही दिसतील कदाचित...पनवती.' अशी जहरी टिका आमदार राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. 

सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी टाटा पॉवर कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या विजेचे ग्रीड बंद पडले होते. त्यामुळे अर्ध्या मुंबईचे दिवे गेले. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती.

यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणेमधील बहुतांश भाग प्रभावित झाला होता. तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे चर्चगेट ते बोरिवली दरम्यानची उपनगरी सेवा बंद झाली होती. 


ठाकरे सरकारच्या राज्यात अंधार : किरीट सोमय्या 

मुंबई शहर व परिसरात आज वीज पुरवठा खंडित होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार व त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. 

याबाबत सोमय्या म्हणाले, "देखभाल दुरुस्तीच्या कामाचे नीट नियोजन केले जात असल्याने ग्रीड फेल्युअरचा हा प्रकार घडला आहे. त्यातच शंभर युनिट, तीनशे युनिट वीज मोफत देण्याबाबत ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. हो लोकांची बत्ती गुल केल्याशिवाय राहणार नाहीत.'' 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com