एका महिलेच्या मागे लांडग्या सारखं लागता, घर तोडता यावर आम्ही बोललो : चंद्रकांत पाटील - It looked like a wolf behind a woman, we talked about breaking into the house: Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

एका महिलेच्या मागे लांडग्या सारखं लागता, घर तोडता यावर आम्ही बोललो : चंद्रकांत पाटील

उमेश घोंगडे 
रविवार, 27 सप्टेंबर 2020

अर्थात  कंगना राणावत हिला शिवसेनेने ज्याप्रमाणे लक्ष्य केले होते त्याकडे चंद्रकांतदादांनी लक्ष वेधले

पुणे : हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. येथे महिलांचा नेहमीच सन्मान केला गेलाय. अभिनेत्री कंगना राणावत हिच्या स्टेटमेंटशी आम्ही सहमत नाही. मात्र एका महिलेच्या मागे लांडग्या सारखा लागता. तिचं ऑफीस तोडता, हरामखोर सारखी भाषा वापरता यावर आम्ही बोललो असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

अर्थात शिवसेनेने कंगना राणावत हिला ज्याप्रमाणे लक्ष्य केले होते त्याकडे चंद्रकांतदादांनी लक्ष वेधले. "सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत चंद्रकांतदादा बोलत होते. ठाकरे सरकारचा कारभार, मराठा आरक्षण, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण, कंगना राणावतची वादग्रस्त विधाने आदी मुद्यावर दादांनी दिलखुलास उत्तरे दिली. 

अभिनेत्री कंगना राणावत असेल किंवा दिपिका पदुकोण यांच्या संदर्भाने भाजपची जी भूमिका आहे. ती मुंबई पोलीस किंवा मराठी माणूस,महाराष्ट्राविरोधात आहे असे परसेप्शेन आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कंगना राणावतच्या मताशी आम्ही सहमत नाही. पण, महाराष्ट्रात नेहमीच महिलांचा केला केला जातो. मात्र लांडग्या सारखं एका महिलेल्या मागे लागणे आणि तिचं घर तोडणे हे योग्य नव्हते. एका महिलेविषयी जी भाषा वापरली गेली त्याला आमचा विरोध होता. 

अर्थाद दादांचा बोलण्याचा रोख शिवसेनेकडेच होता जरी त्यांनी शिवसेनेचे नाव घेतले नाही. 

मुंबई बाबत कंगना राणावतने जे विधान केले होते त्याबाबत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण केले होते याकडेही चंद्रकांतदादांनी लक्ष वेधले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात नवीनच पायंडा पाडला आहे. घराच्या बाहेर न निघता घरात बसून राज्यातील आणीबाणीची परिस्थिती हाताळत आहेत ,अशी बोचरी टीका त्यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे .गेली सहा महिने ते घराबाहेरच पडले नाहीत मग या राज्याचे काय होणार .इतर नेते फिरत असताना त्यांनी असं घरात बसणं योग्य नाही असा सल्लाही त्यांनी ठाकरेंना दिला . 

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते तर तर निश्‍चितच दोनशे टक्के टक्के फरक पडला असता. कारण आमच्याकडे संघटनात्मक ताकद होती सरकारमध्ये समन्वय होता व निर्णय घेण्याची क्षमता होती मात्र या सरकार मध्ये कोणताही समन्वय नसल्याने कोरोनाने राज्यामध्ये हाहाकार माजवला.त्यामुळे लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागेल अशी टीका ठाकरे सरकारवर केली . 

राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे इतर सहकारी राज्यभर फिरत असताना मुख्यमंत्री मात्र घराच्या बाहेर यायला तयार नाहीत. त्याचबरोबर राज्याचे नेते शरद पवार हे ही प्रचंड प्रमाणात फिरत आहेत . मग ठाकरे यांना प्रॉब्लेम काय असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख