आयपीएस संजय पांडे म्हणतात माझ्यावर अन्याय... - IPS Sanjay Pande not happy with reshuffle in Police unit by Thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

आयपीएस संजय पांडे म्हणतात माझ्यावर अन्याय...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021

होमगार्डचे माजी डीजी संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचा कारभार देण्यात आला. मात्र, या बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज झाले आहेत

मुंबई:  सचिन वाझे यांच्या अंबानी स्फोटक प्रकरणातील सहभागामुळे पोलिस दलात मोठे फेरबदल करण्याची वेळ ओढावलेल्या राज्य सरकारसमोर आणखी एक बांका प्रसंग उभा ठाकला आहे. पोलिस दलातील अनेक अधिकारी या फेरबदलांमुळे प्रचंड नाराज असून काहींनी मोठी सुटी घेतली आहे. तर काहींनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित उघडपणे आपली नाराजी दर्शवली. त्यामुळे आधीच वाझे प्रकरणात अडचणीत सापडलेल्या महाआघाडी सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. (IPS Sanjay Pande not happy with reshuffle in Police unit by Thackeray government)

होमगार्डचे माजी डीजी संजय पांडे (Sanjay Pande) प्रचंड नाराज आहेत. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचा कारभार देण्यात आला. मात्र, या बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या आशयाचे पत्रही लिहिले. त्यानंतर संजय पांडे तातडीच्या सुटीवर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे देखिल वाचा - मुंबईला प्रथमच लाभले टाॅप लेव्हलचे आयपीएस अधिकारी

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पांडे म्हणाले, माझ्यावर वारंवार अन्याय झाला असून पोलिस दलातील माझी कारकीर्दच धोक्यात आली आहे. माझ्यापेक्षा ज्युनिअर असणाऱ्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देत बढती दिली जाते. मुंबई पोलिस (Mumbai Police) आयुक्त हेमंत नगराळे हे माझ्यापेक्षा ज्युनिअर असूनही त्यांना तेथे नियुक्त केले गेले. डीजी अँटीकरप्शन ही पोस्टही माझ्यापेक्षा ज्युनिअर अधिकाऱ्याला दिली गेली. एवढी वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही माझी बढती योग्य ठिकाणी झालीच नसून मी राजकारणाचा बळी ठरलो आहे. आतापर्यंत माझ्यावर झालेल्या अन्यायाची आतातरी ठाकरे सरकारने दुरुस्ती करून मला योग्य ठिकाणी बढती द्यावी, अशी मागणी करणारे पत्र संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरूवारी पाठविले. (IPS Sanjay Pande not happy with reshuffle in Police unit by Thackeray government)

पोलिस दलातील फेरबदल कोणते?
-हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त
-रजनीश शेठ यांच्याकडे पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
-संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी
-परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख