India needs population control law! Giriraj Singh's opinion | Sarkarnama

भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा हवा ! गिरीराजसिंह यांचे मत 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जुलै 2020

आज चीन खालोखाल भारताची लोकसंख्या आहे

नवी दिल्ली : वाढती लोकसंख्या ही आपल्या देशासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. कोणी कुठल्याही धर्माचा असो लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणला पाहिजे असे मत केंद्रीय गिरीराजसिंह यांनी म्हटले आहे. 

गिरीराज हे वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत अशी काही विधाने केली आहेत की त्यामुळे देशभर वादळही उठले होते. एका विशिष्ठ धर्माला ते नेहमीच लक्ष्य करीत असतात. त्यांनी आज आपल्या ट्विटर हॅंडलवर ट्विट करून लोकसंख्या नियंत्रणाबाबत मत व्यक्त केले आहे. 

त्यांनी म्हटले आहे की जर भारताला विकसित राष्ट्रांबरोबर उभे राहायचे असेल तर आपणास सर्वात प्रथम लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा लागेल. अफाट लोकसंख्या हे भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. एक कठोर कायदा जो कोणत्याही धर्माचा विचार न करता अमलात आणला पाहिजे आणि प्रत्येकाला तो लागू व्हायला हवा. 

आज चीन खालोखाल भारताची लोकसंख्या आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. मोठी लोखसंख्या असून हा देश लोकशाहीप्रधान आहे आणि भारताच्या लोकशाहीचा आदर्शही जगभर घेतला जातो.

वाढत्या लोकसंख्या आणि देशाचा विकास या मुद्याकडे गिरीराजसिंह यांनी लक्ष वेधले आहे. त्यांना देशातील लोकसंख्या नियंत्रणाखाली यावी असे वाटते. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा आणि तो कायदा कोणच्याही धर्माचा विचार न करता अमलात आणावा असे त्यांना वाटते. आता त्यांच्या या विधानावरून वाद होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. 

येडियुरप्प म्हणतात ,""मी ठणठणीत !'' 
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या कृष्णा या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोना संसर्गाची लागण झाल्याने मुख्यमंत्र्यांनी आता पुढील काही दिवस घरातूनच कारभार पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असली तरी मी ठणठणीत आहे. बरा आहे. माझी कोणतीही काळजी करू नका असे आवाहन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ट्‌विटद्वारे आपल्या चाहत्यांना केले आहे. ट्‌विटबरोबर त्यांनी पत्रकही प्रसिद्धीला दिले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख