मोठी बातमी : किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ

त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाशिम येथील साखर कारखान्यायाला भेट दिली होती.
मोठी बातमी : किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ
Kirit Somaiya .jpg

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकार विरोधात चांगलीच आघाडी उघडली आहे. ठाकरे सरकारमधील विविध मंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करुन त्यांना जेरीस आणले आहे. तर शिवसेनेच्या (ShivSena) खासदार आणि आमदारांवरही सोमय्या यांनी विविध आरोप केले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या सध्या अनेकांच्या निशाण्यावर आहेत. (Increased security for Kirit Somaiya) 

त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना झेप दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्याच्या सरक्षणासाठी आता ४० पोलिस तैनात असणार आहेत. त्यांना आधी  वाय सुरक्षा देण्यात आली होती. वाय सुक्षेत १५ पोलिस होते. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर सोमय्या यांनी भष्ट्राचाराचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाशिम येथील साखर कारखान्यायाला भेट दिली होती. त्या भेटीवेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. तसेच त्यांच्या वाहनावरही शाही फेकण्यात आली होती.  

या घटनेची केंद्रीय गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सोमय्या यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर, राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार भावना गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ, यांच्यास अनेक नेत्यांवर विविध आरोप केलेले आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील 900 कोटी रुपयांचा घोटाळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच केला आहे. असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. आता अनिल परब यांच्यावर कारवाई झालेली आहे. पुढच्या आठवड्यात भावना गवळीच्यावर होणार आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचाही नंबर असून आव्हाड यांना आपली जाहीर नोटीस असणार आहे. त्यामुळे आव्हाड तुम्ही देखील आता बॅग भरायला लागा, असा इशारा सोमय्या यांनी आव्हाड यांना दिला होता.  

Related Stories

No stories found.