अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

सोनू सूदच्या घर किंवा कार्यालयातील कोणत्याही वस्तू वा कागदपत्र जप्त करण्यात आलेले नाहीत.
13Sonu_20Sood_3_0.jpg
13Sonu_20Sood_3_0.jpg

मुंबई  : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सोनू सूद (sonu sood) राजकारणात येऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आयकर विभाग त्यांच्या संपत्तीचा सर्व्हे केला जात आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) सोनू सूदच्या घर, कार्यालय आदी सहा ठिकाणी सर्व्हे केला. मात्र सोनू सूदच्या घर किंवा कार्यालयातील कोणत्याही वस्तू वा कागदपत्र जप्त करण्यात आलेले नाहीत.सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘देश के मेंटॉर’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. 

मुंबई येथील त्यांच्या घरावर आयकर विभागाच्या पथकाने टीम  सर्व्हे केल्याची माहिती समोर आली आहे. आयटी विभागाच्या टीमने सोनू सुदच्या घराचा सर्व्हे केला आहे. आयटी विभागाकडून मुंबईतल्या सोनू सुदच्या असलेल्या सहा ठिकाणी सर्व्हे केला जातो आहे.

सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘देश के मेंटॉर’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. सोनू सूद ट्विटर, फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने ज्या प्रकारे मजुरांना मदत केली, त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. आजही तो कुणालाही मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो. 


सोनूने लॉकडाऊनमध्ये  खूप लोकांना मदत केली होती. त्यामुळे देशभरात सोनूची मोठी चर्चा झाली होती. अनेकांनी तर त्याचं मंदिरदेखील बांधलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद राजकारणात येऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घराचा आयकर विभागाकडून सर्वे करण्यात आलं. आयकर विभागची (Income Tax Department ) टीम काल सोनू सूदच्या घरी गेली होती. आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 133एनुसार सुरू असलेल्या ‘सर्वे अभियानात’ आयकर अधिकारी केवळ व्यावसायिक भाग आणि त्याच्याशी संबंधित भागांची पाहणी करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी विभागाने सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणच सर्वे केला. मात्र कोणत्याही वस्तू वा कागदपत्र जप्त करण्यात आले नाहीत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com