शिवसेनेच्या अकार्यक्षमतेमुळेच महत्त्वाचा प्रकल्प रखडला : कॉंग्रेसच्या भाई जगतापांचा हल्लाबोल 

झारीतील शुक्रचार्य कोण?
Important project stalled due to Shiv Sena's inefficiency: Congress's Bhai Jagtap's attack
Important project stalled due to Shiv Sena's inefficiency: Congress's Bhai Jagtap's attack

मुंबई : सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांच्या आड कोण येत आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेले हे प्रकल्प कशाला रोखले जात आहेत, झारीतील शुक्रचार्य कोण? असे प्रश्‍न उपस्थित करत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या अकार्यक्षमतेमुळेच हा महत्त्वाचा प्रकल्प रखडला आहे, असा आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी शुक्रवारी (ता. 12 मार्च) केला. 

मुंबई कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मलजल प्रक्रिया केंद्र होत नसल्याने भाई जगताप यांनी शिवसेनेला जबाबदार ठरवले. 

मुंबई महापालिका सात ठिकाणी मलजल पंपिंग स्टेशन उभारणार आहे. हे प्रकल्प 2017 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. या प्रकल्पात कोण आडकाठी आणत आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे, असेही भाई जगताप यांनी नमूद केले. 

हे प्रकल्प होत नसल्याने पालिकेला मासिक 10 लाख रुपयांच्या दंडासह 27 कोटी रुपयांचा दंड हरीत लवादाने ठोठावला आहे. यामुळे समुद्राचे पाणी खराब होत आहे. त्यामुळे हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी मागवलेल्या निविदांमध्ये अंदाजित खर्चापेक्षा 30 ते 60 टक्के दराने निविदा भरण्यात आल्या आहेत. 

अशा प्रकारे जास्त दराने निविदा आल्यास पालिका फेरनिविदांची प्रक्रिया करते. मग या प्रकल्पासाठी घाई का, असा प्रश्‍न विचारला असता, भाई जगताप म्हणाले, निविदा प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करून करदात्यांच्या पैशांचे नुकसान होणार नाही, या पद्धतीने हा प्रकल्प उभारणे गरजेचे असून याचे काम लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

या वेळी मुंबई कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा उपस्थित होते. 

राज्य सरकारने सहकार्य करण्याची मागणी 

मुंबईत फक्त देवनार डम्पिंगची क्षमता संपलेली असतानाही तेथे कचरा टाकला जातोय. त्यामुळे तळोजा येथील प्रस्तावित भूखंड महापालिकेला तत्काळ हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. तळोजा येथे पालिकेने अत्याधुनिक प्रक्रिया केंद्र उभारून सर्व कचरा तेथेच घेऊन जावा आणि मुंबईला कचरामुक्त करावे, अशी मागणीही भाई जगताप यांनी केली. आतापर्यंत महापालिकेला 30 हेक्‍टर जागा मिळाली असून उर्वरित 22 हेक्‍टर जागा तत्काळ मिळावी, यासाठी राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज असल्याचेही जगताप यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com