महाविकास आघाडीतील महत्वाच्या मंत्र्यांच्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती संयमाने हाताळत असलेतरी दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे.
important minister of mahavikas aaghadi government will meeting tomorrow in presence of sharad pawar
important minister of mahavikas aaghadi government will meeting tomorrow in presence of sharad pawar

मुंबई: कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताबाहेर निघाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाले आहेत. उद्या त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील महत्वाच्या मंत्र्यांची बैठक होणार आहे. यावेळी मुख्य सचिवांसह राज्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती संयमाने हाताळत असलेतरी दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. राज्यात 50 हजाराहून जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. त्यातील मुंबईची संख्या 30 हजारांवर आहे. मुंबईत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यावरून विऱोधी पक्ष भाजपने जोरदार रान उठवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे. भाजपकडून ही टीका सुरू असताना दगावणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत निघालेली आहे. या एकूण परिस्थतीमुळे राज्यपालांकडून राज्य सरकार बरखास्तीची शिफारस होईल की काय, अशी चर्चा सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यपालांना मोठ्या संख्येने नेतेमंडळी भेटत आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाबद्दल काळजीने बोलले जात आहेत. 

या पार्श्वभुमीवर उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वाच्या मंत्र्यांची बैठक होत आहे. परिस्थितीचे गांभिर्य पाहून पवार यापुर्वीच लढाईत उतरले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत काही बैठका घेतल्या आहेत. भाजपच्या टिकेच्या पार्श्वभुमीवर उद्याच्या बैठकीत काय निर्णय होतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

भाजप नेत्यांनी अगोदर हे आकडे पाहावेत!


मुंबई :   भाजपशासित राज्यात तेथील सरकारांनी कोरोनासमोर लोटांगण घातले असून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी गुजरात
मॉडेलच्या चंद्राला पडलेली विवरे आधी पहावीत आणि नंतर महाराष्ट्र सरकारबद्दल बोलावे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांना दिला आहे.

सावंत पुढे म्हणाले की, गुजरात उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या तक्रारीची दखल घेत कोरोनावर सुनावणी घेऊन गुजरातमधील आरोग्य यंत्रणेचा फोलपणा चव्हाट्यावर आणला आहे. ज्या पद्धतीची विधाने उच्च न्यायालयाने केली त्यातून भाजप सरकारचा अकार्यक्षमपणा उघड झाला आहे.  अहमदाबादमधील कोरोना परिस्थितीवर सरकारच्या वतीने उत्तर देताना महाधिवक्त्यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक असून कोरोनाच्या चाचण्याच करत नसल्याचे सांगून चाचण्या केल्या तर एकट्या अहमदाबादमध्ये ७० टक्के कोरोना रुग्ण आढळतील असे म्हटले आहे. याचा अर्थ अहमदाबादची सध्याची संयुक्त महासंघाच्या अंदाजानुसार ७८ लाख लोकसंख्या गृहित धऱता किंवा २०११ च्या जनगणनेच्या आधारावर अहमदाबादची लोकसंख्या ५५.७ लक्ष आहे हे पाहता ७० टक्के रुग्ण म्हणजे
कमाल ५५ लाख तर किमान ४० लाख कोरोना रुग्ण आहेत असे म्हणावे लागेल आणि निश्चितच हे आकडे दडवले जात आहेत. भाजपशासित राज्यात अत्यंत वाईट परिस्थिती असून उत्तर प्रदेश, कर्नाटकची परिस्थीतीही याहून वेगळी नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com