जिल्हाबंदीबाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्वाचे स्पष्टीकरण 

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी कडक लॉकडाऊनची मागणी केली होती.
 Rajesh Tope .jpg
Rajesh Tope .jpg

मुंबई : राज्यात संचारबंदी लागू करुनही कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात 15 दिवस कडक लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ही घोषणा करु शकतात. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी कडक लॉकडाऊनची मागणी केली होती. लॉकडाऊन केल्यानंतर जिल्हाबंदी होणार नाही, माञ प्रत्येक जाणाऱ्या माणसाला विचारले जाईल आणि विनाकारण जाणाऱ्यांना रोखले जाईल. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी टोपे म्हणाले की, राज्यात सध्या एकूण ६ लाख ८५ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यातील १० टक्के लोकांना ऑक्सिजन लागू शकतो. त्याच प्रमाणे रेमडेसिव्हिरची ही गरज पडणार आहे. टास्क फोर्सने सांगितल्या प्रमाणे देशातील इतर राज्यातून ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामध्ये जामनगर, गुजरात, छत्तीसगड ११० मेट्रिक टन मिळायला हवा, पण ते ६० टक्के देत आहे. भिल्लारीतून २०० मेट्रिक टन मिळणार आहे. राज्य सरकारने ५०० मेट्रिक टनची मागणी केली आहे. माञ ३०० मेट्रिक टनच मिळणार आहे.

परदेशातूनही देशाला ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे. राज्यातही ६ ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये पेण, अलिबाग, वर्धा, नागपूर, बीड, तारापूर येथेही ऑक्सिजनची उपलब्धता होत आहे. मात्र, बॅाटलिंग करता येत नसल्यामुळे तो आणणे शक्य होत नाही. त्यामुळे तिथेच त्या भागात ३००० बेडचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

रेमडेसिव्हिरच्या ७ कंपन्यांच्या मालकांशी बोलणी केली आहे. त्यांच्याकडे दररोज ६० हजार रेमडेसिव्हिरची मागणी केली. ते रेमडेसिव्हिर जिल्ह्यांमध्ये एफडीए मार्फत वाटप केले जाईल. अन्यथा काळाबाजार होईल, त्यामुळे तशा सूचना केल्या आहेत. १ मे नंतर दररोज १ लाख रेमडेसिव्हिर लागू शकतात. कंपन्यांना उत्पादन दुप्पट करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे टोपे म्हणाले. 

ऑक्सिजन बाबतीत पळवा पळवी झाली नाही, शिखरापूरमध्ये टॅंकर थांबवण्यात आला. तेथे ऑक्सिजनचा प्रॅाब्लेम झाला होता. माञ हे टँकर ठरल्या प्रमाणे त्या ठिकाणी गेले पाहिजे. जिल्हा प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही, परस्पर टँकर वळवण्याचा, चिफ सेक्रेटरीच्या मार्गदर्शनानुसार हे वितरीत केले जात आहे. लिकविड ऑक्सिजनचा प्रकल्प उभारायचे म्हटले तर वर्ष जाईल. ऑक्सिजन प्लांटसाठी तातडीने परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी निविदा काढली जाणार नाही. ऑक्सिजन वापरात असलेले सर्व उद्योग बंद करुन तो ऑक्सिजन वापरात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार, असल्याचे टोप यांनी सांगितले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com