झोपडीवासीयांसाठी तातडीने प्रकल्प उभारावेत: गोपाळ शेट्टी 

एसआरए अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांना संमती दिली नाही. त्यामुळे बिल्डर या प्रकल्पाचे काम सुरू करू शकत नाहीत.
झोपडीवासीयांसाठी तातडीने प्रकल्प उभारावेत: गोपाळ शेट्टी 

मुंबई : एसआरए प्रकल्प रखडल्याने हलाखीत जीवन जगणाऱ्या झोपडीवासीयांना दिलासा मिळण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने या प्रकल्पांचे बांधकाम स्वतः तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. 

प्रकल्प मंजूर झाल्यानंतर एक बिल्डर दुसऱ्याला व तो तिसऱ्याला विकतो व प्रकल्प रखडतो. अशा वेळी स्थानिक राजकारणी मलाई मिळवात, असा आरोपही शेट्टी यांनी केला. 

उत्तर मुंबईतील आठ एसआरए प्रकल्पांचे काम अनेक वर्षे रखडले आहे. ते काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी शेट्टी यांनी एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. श्रीमाऊली बंदर पाखाडी गृहनिर्माण संस्था, पोईसर डॉ. आंबेडकर नगर एसआरए प्रकल्प, कांदिवलीतील लोकमान्य टिळक गृहनिर्माण संस्था आणि सिद्धेश्वर (ए) सहकारी संस्था, बोरिवलीतील वेस्टर्न अबिटेड,

सीताराम गृहनिर्माण संस्था, अविराही एसआरए आणि विघ्नहर्ता अंबावाडी व दहिसर पूर्व हे एसआरए प्रकल्प रखडल्याचा शेट्टी यांचा दावा आहे. याबाबत एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घ्यावेत, अशी विनंती शेट्टी यांनी केली आहे. 

एसआरए अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांना संमती दिली नाही. त्यामुळे बिल्डर या प्रकल्पाचे काम सुरू करू शकत नाहीत. अशा स्थितीत अनेक जण अन्य झोपडपट्ट्यांमध्ये किंवा काही जण मुंबईबाहेर लांब गेले; तर काही जण बेघर झाले आहेत, असेही शेट्टी यांनी सांगितले. 

राजकारणीही हात धुऊन घेतात!
अनेक ठिकाणी बिल्डर एसआरए प्रकल्प सुरू करण्याची संमती घेतात व काही वर्षांनी प्रकल्प दुसऱ्याला विकतात. दुसरा बिल्डर हा प्रकल्प तिसऱ्याला विकतो. यात स्थानिक राजकारणीदेखील हात धुऊन घेतात व झोपडीवासीयांचे हाल होत राहतात. म्हणून अशा रखडलेल्या प्रकल्पांचा ताबा एसआरएने घ्यावा व प्रकल्प पूर्ण करावा. पुनर्वसनाच्या आणि विक्रीच्या इमारतीही एसआरएने स्वतः बांधून त्या स्वतःच विकाव्यात, असेही खासदार शेट्टी यांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com